Saturday, October 1, 2016

संत ज्ञानेश्‍वरांनी चामुंडा देवीला अर्पण केलेला बळी ! (मराठी)

संत ज्ञानेश्‍वरांनी चामुंडा देवीला अर्पण केलेला बळी !
काय आपण संतांनी अनुप्राणित केलेल्या मार्गाने जाणारे वारकरी आहोत ? काय आपण भागवतधर्मरुपी विठ्ठलाला समर्पित आहोत ? काय हरीप्रेमानं आपलं हृदय उन्मळुन येतं ? काय आपण भक्तिप्रेमरुपी सद्गुरुंनी दाखवलेल्या मार्गाने जाणारे आहोत ? कुलस्वामीनीच्या उपासनेमध्ये काय खरोखरंच आपले नवरात्र धन्य झाले असे वाटते आहे ? याचे उत्तर हो असेल तर दसर्‍याला देवाच्या नावाने अर्पण केला जाणार्‍या बळी प्रथेला आपण विरोध करु. ज्ञानेश्‍वर माऊलींनी बळीचा खरा अर्थ समजाऊन सांगितला आहे.
प्राणशक्तिचामुंडे । प्रहारूनि संकल्पमेंढे । मनोमहिषाचेनि मुंडे । दिधली बळी ॥ ज्ञानेश्‍वरी-12-53॥
    महावैष्णव ज्ञानेश्‍वर माऊलींच्या उपासना यात्रेत कुठल्या रेड्याचा व मेंढ्याचा बळी दिला जातो ? हे पहिल्याच माळेला आपल्याला कळले तर नवरात्रीच्या जागरणाला वा उपासनेला ते पूरक ठरु शकेल.
    संकल्प विकल्प हा मेंढा व मनरुपी रेडा यांना प्राणशक्ति चामुंडा देवीस बळी दिला आहे, असे संत ज्ञानेश्‍वर सांगतात. ज्ञानदेवांचे असे नवरात्र समापन विलक्षण आहे. हे खुप आंतरिक रहस्य आहे की ज्यात मन-चित्ताची बळी देण्याची ही यौगीक पद्धती सद्गुरुकृपेशिवाय असंभव आहे म्हणुनच एका मर्यादेपर्यंतच शब्दांचा वापर करण्याचे हे धाडस आहे.
    उपासनेत जे सहजच होणार आहे त्या विलक्षण घटनेत सुरुवातीपासुनच मनाला वा चित्ताला जुलुम जबरदस्तीने दाबण्याचे कारण नाही, या वाटचालीत सुक्ष्मामध्ये उतरत असताना उपासनेचा संवेदनशिल नाजुक भाग चालु होतो. मनाचा वा चित्ताचा क्रियासंभव हा केवळ कुंडलिनी प्राणशक्तीच्या तेजाचाच असतो. अपेक्षित मन मौनी व चित्त चैतन्य हे सद्गुरुकृपेने स्वभावेच घडुन येते.
    आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा। मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य॥1॥ मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला। गोरक्ष बोलला गहीनीप्रती। गहीनीप्रसादे निवृत्ती दातार। ज्ञानदेवा सार चोजविले॥3॥ आपल्या गुरुपरंपरेचा उल्लेख करताना कैवल्यरुप माऊलींवर नाथपंथीय हठयोगाचा प्रभाव आहे हे स्पष्टच होते.   
    हठयोग शक्तिवादी आहे. यात शक्ति व ज्ञान निष्ठेने उपासकाचे जीवन समर्पित असते. ज्ञान म्हणजे शिव व कुंडलिनी म्हणजे शक्ति. ही शिवशक्तिसामरस्यान्वित उपासना हठयोग मार्गाने जाते. दुसरा कुठलाही संप्रदाय ज्यास चामुंडा संबोधित नाही त्या कुंडलिनीला, प्राणशक्तिला ‘चामुंडे’ संबोधुन त्या अतिप्राचीन नाथपरंपरेचा माऊली गौरवाने उल्लेख करतात.
    चामुंडा ही अज्ञ लोकांची देवी आहे. विकाराच्या वार्‍याने अतिशय फडफडल्यामुळे विगलितगात्र अवस्था प्राप्त झालेल्या, बंधनात अडकलेले असल्यामुळे आधिभौतिक, आधिदैविक व अध्यात्मिक दु:खाचा अनुभव घेणार्‍या कोणाही जीवाला अज्ञ म्हटले जाते. अशा अज्ञांची समस्त बंधने तोडुन त्यांची शिवत्वाशी गाठ भेट घडवून आणणारी ही चामुंडा ‘महदंबा’ आहे.
    चामुंडा म्हणजे तपस्विनी कुमारिका. जिची उपासना करुन उपासकाला शिवत्वाचे भान येते. नवरात्रात हा समर्पणाचा चितशक्तिविलास आपोआप चालु राहतो. जो प्रारंभी प्रकृतीवशात आपण अनाथ आहोत असे बरळत असतो तोच चामुंडेच्या कृपेने व शिवत्वाच्या भानाने आपोआप नाथ होतो व इतरांना सनाथ करण्याचे सामर्थ्य मिळवतो.
    नाथपंथी बाहेर शिव, आत शाक्त व समाजात वैष्णव असावा असा संदेशच आहे. त्यामुळे वैष्णवता हे त्याचे हृदय, शिवता हे मस्तक तर शक्तियुक्त असणे हे मन होते. साहजिकच तो शक्तिमय, योगनिष्ठ, जनहितकारी, आचारवान असतोच. म्हणुनच तो ‘नाथ’ या संज्ञेला पात्र ठरतो.
    प्रारंभी मन-चित्ताच्या क्रिया जेव्हा मलिन असतात तेव्हा ‘नाथत्व’ अप्रकट असते. जीवाची हीच अनाथ अवस्था असते. तिथे पशुवत चेतना प्रभावी ठरते. उपासनेच्या सहज यात्रेत ती संवेदनशील वळणावर कुंडलिनीत लीन होते. ही सहज लीनता महत्त्वाची घटना ठरते.
    मनोदोष म्हणजे संकल्प विकल्प होत, चित्तदोष म्हणजे ‘असत’ यावर श्रद्धाशील असणे होय. ही प्राणशक्ति जागृत होताच हे दोष नाहिसे होतात. अर्थात या दोषांचे ‘अर्पण’ करणे ज्ञानेशांना अपेक्षित असल्याने माऊलींच्या नवरात्रात देवीचा थाट असामान्य आहे. इथे ते ‘वीरयोगी’ लक्षणा प्रकट करतात. हा वीरयोगी चामुंडेला असा बळी अर्पण करुन शिव होतो.
    त्याचा नवरात्र जागर सिद्ध होतो, तो अज्ञतेचे सिमोल्लंघन करुन अनंत चैतन्याच्या प्रांगणात विजयोत्सव साजरा करतो. त्या पुढेही - उपासनेच्या उत्कट पोर्णिमेला कोजागरती ? विचारत येणारी शक्ती अशा ‘जागलेल्या’ नाथाला पाहुन प्रसन्न होते. ज्ञानरुपी चंद्राच्या शितल प्रकाशात अमृतस्य पुत्र: ! या भावमयतेचे दुग्धामृत प्राशन करुन तो संजीवन झालेला असतो. ज्ञानेशांची परंपराही या नाथ - वैष्णवाच्या अशा प्रवेशाने धन्य होते ! अशा तापहीन मार्तंडांचे धुंद वारी नृत्य, हे आनंदगान अस्तित्वात चालूच राहते.
    भवतारिणी चामुंडेच्या चरणी प्रतिक्षणाला समर्पित भावमयतेचा हा अखंड जागर आपण सुरु करुयात व अज्ञानाचा रेडा तिच्या चरणी बळी देऊयात. जय चामुंडा भवानी !
लेखनसेवा- दामोदर प्र. रामदासी !

Tuesday, August 23, 2016

सहजीया वैष्णव पंथ ! भाग 1 (हिंदी)

कृष्णजन्माष्टमी के निमित्त भावपुष्प

सहजीया वैष्णव पंथ !
भाग 1


    भगवान विष्णु कृपाका उत्सव कही भी शुरु हो सकता है; ऐसा संदर्भ ऋग्वेद में है। यत्रा सुपर्णा अमृतस्य भागमनिमेषं विदथाभिस्वरन्ति। इनो विश्‍वस्य भुवनस्य गोपा: स मा धीर: पाकमत्रा विवेश॥ (ऋग्वेद 1.164.21) अर्थात अमृतका कुंभ जिसके  स्वाधीन है ऐसा परमात्म तत्त्व- महान आत्मा- जगत्स्वामी सर्वज्ञ ईश्‍वर मेरे जैसे अपक्व स्थिती के जिज्ञासु साधकजीवन में प्रवेश करता है; अर्थात किरणों में सूर्यप्रकाश जैसा सभी स्तरोंपर प्रवेश करता है वैसे ही यह परमात्मा साधकजीवन में स्वप्रकाश लेकर  अवतरीत होता है। तथापी यह कृपा साधक जीवन के शुरुआती समय की है, भगवान का यह रुप प्रभातसमय के सूर्यसमान जैसा है। जहा जिवात्मा प्रथम जागृत होता है। विष्णुमय जगत का भावोत्सव, समर्पणका गंगा तट तो अभी भविष्य के गर्भ में है। जहाँ यह अमृतकुंभ उलटा होगा।
    शरण्य प्रपत्तिदशा (चित्त की शरणमार्गीय दशा) उपासकको आरंभ में प्राप्त होती है, भगवान से शरण्य एकता होती है। स्व-तंत्रता कृष्ण तंत्रता हो जाती है। बालक को माँ गोदी में लेती है। वैसे ही सहजसाधना का कृपापंथ याने भक्तियोग भगवान ही घटीत करते है। ऐसे समय गोदी में मजे से बैठा हुआ बालक माँ को एकटक देखता रहता है। उस समय माँ के बारे में अनेकानेक विचारों से उसका मन भर जाता है।
    विराटका सिकुडना याने सगुण श्रीकृष्ण रुप और सगुण का अनंत विस्तार याने विराट। यहाँ भक्त प्रेम के कारण विराट सिकुडा हुआ है। वह पार्थसारथी भक्त को अभ्युदय और नि:श्रेयस के धर्ममार्ग पर ले जा रहा है। सगुण की लीला दिखाते समय उस परमसद्गुरुके अमृतशब्द पर किया हुआ ध्यान उपासकको प्रपंच और परमार्थ दोनो बातो में सिद्धी दिलाता है।
    उपासक की परिशुद्ध और निर्मल प्रज्ञा को भगवान के अनेक रुप दिखायी देते है। श्रीकृष्ण चेतना अध्यात्म की परम गहनताए और अभिव्यक्ति की अलौकीक उंचाइयाँ प्राप्त करते समय गंभीर रस की अपेक्षा आनंदरुपी अमृतसागर के उबाल धारण करती है जिसमें उपासक नखशिखांत भिग जाता है।
    मानवजाती के इतिहास में इतनी समग्रतासे और अनेक अंगों से जीवन को सहजता से स्वीकार करने वाली श्रीकृष्ण जैसी चेतना दुसरी नही हुई । सृष्टी ने दिए हुए सारे सुकोमल या नुकीली भावनांओं का सन्मान उसने बढाया। दुखी चित्त के काँटोंवाले जीवन को खिलने का सपना दिया। उदासीनता या दमन का निषेध करते समय - उन सारी भावनाओं में क्या मै नही बह रहा ? फिर तेरे सामने या तुझ में जो भी प्रकट हो रहा है उसका उत्सव मनाने के अलावा तेरे हातो में अब क्या रह जाता है ? इस प्रश्‍न से उस उपासक को जीवन का प्रसाद दिया ।
    उसने ‘अकारण आनंदीत हो’ का मंत्र दिया। फुल किस ध्येय से खिलता है ? वायु का ध्येय क्या है ? उत्तर है अकारण !
    शरीर के स्पंदन, बहनेवाली अनंत भावनांए इनका सहजस्वीकार कर ने को उसने बाध्य किया। इनसे लडने की अपेक्षा, रुपांतरण का मार्ग दिखाया। कारण वे शक्तियाँ अपनी ही तो है ! उनसे लडना याने एक हातने दुसरे हातसे लडने जैसा है ।
    विषयेभ्य: परावर्त्य स्थापनं स्वस्वगोलके। उभयेषामिन्द्रियाणाम् स दम: परिकीर्तित:॥विवेकचुडामणि-23॥ कर्म और ज्ञान इंद्रियों का प्रत्याहार अर्थात उन्हे अंतर्मुख करना, केंद्र की ओर वापसी याने दमन है ऐसे आदि शंकराचार्य कहते है। कुछ जीवोंको लगता है की दमन याने भावनाओं को दबाना, अरे यह तो भक्तिविरोधी है। सृष्टी ने दि हुई भावना विष्णुमय है। वह तो विष्णुकी ही कृपा है। तद्विष्णो: परमं पदम् सदा पश्यन्ति सूरय:। दिवीव चक्षुराततम्॥ (ऋग्वेद 1.22.20) इस व्यापक भगवान का साधकको पूर्ण सहयोग होता है। इसका ही उदात्त प्रकाशमान रुप साधकजन अंतराकाश में निहारते रहते है। उस कृपा के कारण वह साधक प्रकाशीत होता है।
    आंतरजगत विष्णुमय होने के बाद उस उपासकका स्वधर्मचक्रप्रवर्तन विविध स्तरों पर शुरु हो जाता है। सारे भेद नष्ट होते है। अनेकानेक जन्मों की अमंगलता समाप्त हो जाती है। उपासकको परिपूर्ण करने में विष्णुतत्त्व मदत करता है। इस कारण सारी भावनांए शरीरमन में एकरस में होती है। उनका कृष्णमय होना ही क्रांती का समय है। उस कृष्ण परमात्मा को आत्महिंसा या तथाकथित दमन कबुल नही है।
    तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् । मयैवैते निहता: पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्॥गीता11-33॥ हे सव्यसाची (बांए हाथ से बाण छोडने की क्षमतावाला) इस कारण तू उठ, यश प्राप्त कर। शत्रू को परास्त कर धनधान्यसंपन्न राज्य का भोग ले। यह सारे शूरवीर पहले ही मेरे हाथों से मारे गए है। तू बस निमित्तमात्र है !
    कृष्ण रस से रसमय हुआ ऐसा उपासक यह उपदेश पाकर पलायन नही करता। भक्ति का सामर्थ्य प्राप्त हुआ वह- अगर पुरुष हुआ तो स्त्री से भागता नही। अहिंसा और शांतीरुपी धर्मक्षेत्र से सिधे कुरुक्षेत्र के युद्ध में, हिंसा के दावनल में उतरनेकी हिंमत रखता है। बाहर अनंत संघर्ष आहे पर भीतर मात्र उसकी अनंत शांती भ्रष्ट नही होती।
    जीवनका समग्रतासे स्वीकार करनेवाली चेतना उपासक में निर्माण करना यही तो उसकी लीला का ध्येय है। फिर अमृत हाथ में आते ही उस उपासकको विष का क्या डर ? अहिंसा सिद्ध होते ही हिंसा का क्या भय ? और अगर वह अहिंसा हिंसा को डरती हो, तो उसे नपुंसकच कहना ही उचीत होगा । समस्त द्वंद्वों का एक साथ स्वीकार यही कृष्ण भक्ति है ! यही समर्पण है !
श्रीकृष्णार्पणमस्तु !
लेखनसेवा - दामोदर प्र. रामदासी

विष्णुमय जग ! वैष्णवांचा धर्म !! भाग 1 (मराठी)

कृष्णजन्माष्टमी च्या निमित्ताने लेखन भावपुष्प

विष्णुमय जग ! वैष्णवांचा धर्म !!
भाग 1

    भगवान विष्णु कृपेचा सोहळा कुठेही करु शकतात; असा उल्लेख ऋग्वेदांत आहे. यत्रा सुपर्णा अमृतस्य भागमनिमेषं विदथाभिस्वरन्ति। इनो विश्‍वस्य भुवनस्य गोपा: स मा धीर: पाकमत्रा विवेश॥ (ऋग्वेद 1.164.21) अर्थात अमृताचा कुंभ ज्याच्या स्वाधीन आहे ते परमात्म तत्त्व- महान आत्मा- जगत्स्वामी सर्वज्ञ ईश्‍वर माझ्यासारख्या अपक्व दशेतील जिज्ञासु साधकजीवनात प्रवेश करता झाला; अर्थात किरणांत सूर्यप्रकाश जसा सर्वत्वाने प्रवेशतो तसा हा परमात्मा साधकजीवनात स्वप्रकाशाने अवतरतो. तथापी ही कृपा साधकांच्या अपक्वकाळी आहे हे लक्षात ठेवावे. भगवंताचे हे रुप प्रभातकाळच्या सूर्यासारखे आहे. जिथे जिवात्मा प्रथम जागृत होतो. विष्णुमय जगताचा भावोत्सव, समर्पणाचा गंगा तट तर अजुन पुढेच आहे. जिथे हा अमृतकुंभ पालथा होईल.       
 पै आपुलेनि भेदेविण। माझे जाणिजे जे एकपण। तयाचि नांव शरण। मज येणें गा॥ ज्ञा. 18.1398॥
    शरण्य प्रपत्तिदशा (चित्ताची शरणमार्गीय दशा) उपासकास सुरुवातीस प्राप्त होते, भगवंताशी शरण्य एकता होते. स्व-तंत्रता कृष्ण तंत्रता होऊन जाते. आईने लेकराला कडेवर घ्यावे तसे सहजसाधनेचा कृपापंथ म्हणजे भक्तियोग भगवंत घडवून आणतात. अशावेळी कडेवर बसलेले लेकरु आईकडे मौजेने बघायला लागते. आईविषयीच्या अनेकानेक भावनांनी त्याचं चित्त भरुन जातं.
    विराटाचे संकर्षण म्हणजे सगुण श्रीकृष्ण तर सगुणाचे अनंत विस्तरण म्हणजे विराट. इथे भक्तप्रेमापोटी विराटाने संकर्षण केलेले आहे. तो पार्थसारथी भक्ताला अभ्युदय व नि:श्रेयसाच्या धर्ममार्गावरुन नेत आहे. सगुण प्रत्ययाची लीला दाखवताना त्या परमसद्गुरुच्या अमृतशब्दांवरील ध्यान उपासकाला प्रपंच व परमार्थ दोन्हीमध्ये सिद्धी दिल्याशिवाय राहत नाही.
    उपासकाच्या परिशुद्ध व प्रांजळप्रज्ञेला भगवंताची अनेक रुपे दिसतात. श्रीकृष्ण चेतना अध्यात्मातील परम गहनता व अभिव्यक्तिची अलौकीक उंची गाठतानाही गंभीर रसापेक्षा आनंदरुपी अमृतसागराचे रुप धारण करते जिच्या उकळ्या उपासकाला आचिंब भिजवून टाकतात
    मानवजातीच्या इतिहासात इतक्या समग्रतेने व चहुअंगाने जीवनाला सहजतेने स्वीकारणार्‍या श्रीकृष्णासारखी चेतना दुसरी झाली नाही. सृष्टीने दिलेल्या सर्व सुकोमल वा टोकदार अशा विविध भावनांचा सन्मान त्याने वाढवला. दु:खी चित्ताच्या काटेरी आयुष्याला उमलण्याचे स्वप्न दिले. उदासीनता वा दमनाचा निषेध करत - त्या सर्व भावनांतून मीच वाहत नाही का ? मग आता तुझ्यासमोर वा तुझ्यातुन जे प्रकट होईल त्याचा उत्सव साजरा करण्यापलिकडे तुझ्या हातात काय आहे ? या प्रश्‍नाने त्या उपासकाला जीवनाचे पसायदान दिले.
    त्याने ‘अकारण आनंदी व्हा’ चा मंत्र दिला. फुल कुठल्या ध्येयाने उमलते ? वार्‍याचे ध्येय काय ? उत्तर आहे अकारण !
    शरीराची स्पंदने, वाहणार्‍या अनंत भावना यांचा सहजस्वीकार स्वीकारायला तो भाग पाडतो. त्यांच्याशी लढण्यापेक्षा, दमनापेक्षा रुपांतराचा मार्ग दाखवतो. कारण त्या शक्ति आपल्याच आहेत. त्यांच्याशी लढणे म्हणजे एका हाताने दुसर्‍या हाताशी लढल्यासारखं आहे.
    विषयेभ्य: परावर्त्य स्थापनं स्वस्वगोलके। उभयेषामिन्द्रियाणाम् स दम: परिकीर्तित:॥विवेकचुडामणि-23॥ कर्म व ज्ञान इंद्रियांचा प्रत्याहार अर्थात त्यांना अंतर्मुख करणे म्हणजे दमन असे आदि शंकराचार्य सांगतात. काहिंना वाटणारे दमन (भावनांना दाबुन टाकणे असे समजणे) भक्तिविरोधी आहे. सृष्टी प्रदत्त भावना विष्णुमय आहेत किंबहुना विष्णुंचीच कृपा आहे. तद्विष्णो: परमं पदम् सदा पश्यन्ति सूरय:। दिवीव चक्षुराततम्॥ (ऋग्वेद 1.22.20) या व्यापक भगवंताचा साधकास पूर्ण सहयोग असतो. याचेच उदात्त प्रकाशमान रुप साधकजन अंतराकाशात न्याहाळतात, त्या कृपेने तो साधक प्रकाशतो.
    आंतरजगत विष्णुमय झाल्यावर त्या उपासकाचे स्वधर्मचक्रप्रवर्तन विविध स्तरांवर आत सुरु होते. सर्व भेद मावळतात. जन्मोजन्मीची अमंगलता मावळते. उपासकाला परिपूर्ण करण्यास विष्णुतत्त्व मदत करते. म्हणूनच त्या सर्व भावभावना शरीरमनांतून एकरस असतात. त्यांचं कृष्णमय होणं ही घटना क्रांती घडवून आणते. त्या कृष्णाला आत्महिंसा वा तथाकथित दमन मान्य नाही.
    तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् । मयैवैते निहता: पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्॥गीता11-33॥ हे सव्यसाची (डाव्या हातानेही बाण सोडु शकणारा) म्हणून तू ऊठ. यश मिळव. शत्रूंना जिंकून धनधान्यसंपन्न राज्याचा उपभोग घे. हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेले आहेत. तू फक्त निमित्तमात्र हो !
    कृष्ण रसाने रसमय झालेला असा उपासक हे ऐकून पलायन करत नाही. भक्तिचं सामर्थ्य लाभलेला तो- पुरुष असला तर स्त्री पासुन पलायन करत नाही, अहिंसा व शांतीस्वरुपाच्या धर्मक्षेत्रावरुन थेट कुरुक्षेत्रावरील युद्धात, हिंसेच्या दावनलात उतरायची छाती ठेवतो. बाहेर अनंत संघर्ष आहे पण आत मात्र त्याची अनंत शांती ढळत नाही.
    आयुष्याचा समग्र स्वीकार झालेली चेतना उपासकात जन्माला घालणं हेच तर त्याच्या लीलेचं ध्येय, मग अमृत हाती आल्यावर त्या उपासकाला विषाची काय भिती ? अहिंसा सिद्ध झाल्यावर हिंसेचे काय भय ? जर ती अहिंसा हिंसेला घाबरत असेल, तर तीला नपुंसकच म्हणायला हवी. समस्त द्वंद्वांचा एक साथ स्वीकार हीच कृष्ण भक्ति ! हेच समर्पण !
श्रीकृष्णार्पणमस्तु !
लेखनसेवा - दामोदर प्र. रामदासी

Friday, August 5, 2016

तरी मातेंचि गा पावसी। हे माझी भाक ॥ समर्पणाची कसोटी व कर्मसंन्यास (मराठी)

तरी मातेंचि गा पावसी। हे माझी भाक ॥
समर्पणाची कसोटी व कर्मसंन्यास (मराठी)

    आत्मदानाची दिव्यता म्हणजे समर्पण भाव. समर्पण म्हणजे भगवंताप्रति असलेली सर्वोच्च अविचल स्थिती. समृद्ध प्रगतियान. यतोऽअभ्युदय नि:श्रेयस सिद्धी स धर्म:॥ अभ्युदय अर्थात प्रापंचिक व नि:श्रेयस अर्थात पारमार्थिक सर्वोच्च लब्धता म्हणजे धर्म पण या पुरुषार्थासाठीही हवी पूर्ण समर्पणाची चित्तस्थिती. समर्पणाच्या भावना जीवनास लक्ष्याकार करतात. लक्ष्य व वेध घेणारा दोघांनाही दिव्यता देतात. हेच भगवंताप्रति असलेले भागवत आत्मनिवेदन वा अव्यभिचारी प्रेम होय. वेद ज्यास यज्ञ म्हणतात त्यास अध्यात्मात भक्ति म्हणतात, समर्पण शब्दात वरील सर्व भाव अनुस्युत होतात. अर्थात यज्ञ प्रवृत्तीत अभिलाषा डोकावते हा विचार अलाहिदा ! जे भक्तिंत वा समर्पणात नसते.
    मय्यर्पित मनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्॥गीता 8.7॥- अर्थात माझ्याच ठिकाणी मन व बुद्धी अर्पिली आहेत असा तू मलाच प्राप्त होशील यात संशय नाही.
    तू मन बुद्धि साचेसीं। जरी माझिया स्वरूपी अर्पिसी। तरी मातेंचि गा पावसी। हे माझी भाक॥- माऊली म्हणते- हे अर्जुना, तू मन आणि बुद्धी ही खरोखर माझ्या स्वरुपात अर्पण करशील तर मग माझेच रुप होशील हे प्रतिज्ञापूर्वक तुला मी सांगतो.
    यात भगवंताने वापरलेला प्रतिज्ञापूर्वक हा शब्द सृष्टीचा सनातन नियम आहे. सिद्धांतरुप आहे. त्यामुळे या समर्पित होण्याच्या भावदशेला आपोआपच महनीयत्व प्राप्त होते.
    यत्करोषि यदश्‍नाचि यज्जुहोषि ददासि यत्। यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्॥ गीता 9.27॥ अर्थात घडणार्‍या प्रत्येक क्रियेत ईश्‍वरार्थ धारणा ठेवणे हा समर्पणाचा प्रथम पाठ होतो. कारण ज्याप्रति समर्पित व्हायचे ती गोष्टही व्यापक व पूर्ण हवी. अपुर्‍या पदार्थांप्रति समर्पित होणे म्हणजे तसेच गुणसमुच्चय समर्पित होणार्‍या चित्तात प्रकट झाले म्हणून समजावे.
    म्हणून समर्पित होताना काय चित्त दशा हवी ? तर 1) जसा मी देवास हवा होतो तसेच त्याने मला घडवले व तेवढेच त्याने मला दिले 2) जे दिले तेही त्याच्यासाठीच व त्याने माझे सामर्थ्य पाहुन मला दिले, ते देणे किती असावे हे मी ठरवु नये वा तशी वासना करु नये व दिलेले ते मी त्याच्यासाठीच वापरायचे आहे. 3) जसा फुलास सुगंध, वार्‍यात वाहणे दिले तसे. तेव्हा त्या फुलाने वारा होणे वा वार्‍याने फुल होण्याचा हट्ट करु नये. कारण तसा हट्ट हा त्या देवाने जे दिले त्याप्रति अप्रसन्न होण्यासारखे आहे अशा चित्तात समर्पण ढासळले असे समजावे. आपापल्या दिलेल्या शक्तिने समर्पित होणे हेच प्रसन्नतेचे रहस्य आहे.
    4) म्हणून स्वत:प्रति अज्ञानाचा वा कमीपणाचा वा अपराधीवृत्तीचा गंड हा पारमार्थिक गुन्हा आहे. कर्मवृत्तिचा त्याग वा निवृत्ती हे ढोंग होऊन बसते कारण तसे करणे म्हणजे देवाने जे माझ्यासाठी नेमून दिले त्याप्रति नाखुष असणे आहे वा त्या कर्मांच्या माध्यमातून देवाला माझा समर्पणाचा भाव हवा होता त्याला मीच खोडा घातल्यासारखा होईल. म्हणून जे माझ्याकडुन कर्म होते आहे ते माझ्यामार्फत तोच करतो आहे व ते त्यालाच समर्पित होते आहे हा भावच ईशपूजा आहे. 5) म्हणुन त्या सर्व कर्मांच्या बाबतीत अखंड प्रसन्नभाव व उत्साह हा चित्ताच्या ठिकाणी चोवीस तास राहिला असेल तर देव माझ्यावर खुश आहे असे समजावे.
    बाह्य कर्मांबरोबर मन (संकल्प व भोग), चित्त (आस्था), बुद्धी (स्मृति व गति) व अहंकार (अभिमान व अस्मिता) या सर्व अंतरीय शक्ति ईश्‍वरार्थ वापरणे हे स्वाभाविकच आले.
    ठेविले अनंते तैसेचि राहावे। चित्ती असु द्यावे समाधान ॥तुकाराम॥ यात ठेविले या संकल्पनेतील गहनता चिंतनीय होऊन जाते.
    जगाच्या खेळात नेमून दिलेले काम इतरांच्या सहयोगाने करावे लागते तेव्हा एखाद्याने त्या खेळात ते काम टाळले तर खेळातील आनंद संपून जातो. त्यांना आनंदही हवा आहे पण कामही नको आहे. असे खेळाडु खेळ मोडतात वा खेळ टाकुन वेगळे होतात. या जीवांना तथाकथित कर्मसंन्यासी जाणावे. यांना आनंदाची वासना आहे पण खेळ नकोय. एक प्रकारे देवनिर्मित खेळातील हा अपराधी ठरतो कारण त्या खेळाला त्याने खोटे मानलेले असते.
    माऊली देह असे पर्यंत कर्मत्याग अशक्य आहे असे ठणकाऊन सांगतात- तैसा शरीराचेनि आभासे। नांदतु जव असे। तव कर्मत्यागाचे पिसे। काइसे तरी॥ज्ञा.18.222॥ व या पाच कारणांमुळे कर्म घडते असे ते सांगतात- 1) देह- तैसी यथा लक्षणे। आइके कर्मकारणे। तरी देह हे मी म्हणे। पहिले एथ॥18.315॥, 2) कर्ताजीव- आणि कर्ता हे दुजे। कर्माचे कारण जाणिजे। प्रतिबिंब म्हणिजे। चैतन्याचे जे ॥18.321॥, विभिन्नइंद्रिये- ते पृथक्विधकरण। कर्माचे इया कारण। तिसरे गा जाण। नृपनंदना॥18.331॥, कर्तृत्वशक्ति- तैसी क्रियाशक्ति पवनी। असे जे अनपायिनी। ते पडिली नानास्थानी। नाना होय॥ ते भेदिली वृत्तिपंथे। वायुशक्ति गा एथे। कर्मकारण चौथे। ऐसे जाण॥18.333/343॥ व दैव-देवांचा समुदाय- ते देववृंद बरवे। कर्मकारण पांचवे। अर्जुना एथ जाणावे। देवो म्हणे॥18.351॥. कर्मसंन्यास तोच ज्यात अहंकार रहित ईश्‍वरार्पण वा सद्गुरुर्पण भाव आहे.
    अहं-बुद्धि-चित्ताप्रति नकारात्मक भाव सोडुन त्यांना ईश्‍वराप्रती जडवुन ठेवणे व जे जे माझ्याकडुन होईल ते सर्व त्यास अर्पण आहे हा भावच कर्मसंन्यास होय. परि तोचि संन्यासु वीरा। करणीयेचा झणे करा। आत्मविवेकु धरा। चित्तवृत्ति हे॥ज्ञा.18.1261॥ ऐसे चैत्य जाते सांडिले। चित्त माझ्या ठायी जडले। ठाके तैसे वहिले। सर्वथा करी॥ज्ञा.18.1268॥
    स्वामी विवेकानंद म्हणतात हे जग म्हणजे एक शाळेच्या खेळाचं मैदान आहे व आपण शाळकरी पोरं त्या मैदानावर खेळण्यासाठी सोडलेली आहोत. ही बुद्धी आल्यावर या जगात हसण्याशिवाय, खेळाडुवृत्तीशिवाय काही शिल्लक राहत नाही. असं असताना आपल्यातून खेळणाराही तोच, खेळही तोच होतो. त्यामुळे धरुन ठेवावं असं काही राहत नाही. हा खेळच चिद्विलास आहे.
    भोगविषयांवरील आसक्तिभावनेपेक्षा प्रेमाची भावना महत्त्वाची. भोगही तोच. अहं भावनेप्रति अपराधभाव धरण्यापेक्षा त्याला व्यापक स्वरुप देणं अगत्याच होतं. लोभही त्याचा, दंभही तोच, मोहातला मोहनही तोच अशावेळी षड्विकार ही विकाराची भावना जाऊन षडभावयुक्त असा मी तोच आहे असे व्यापकत्व येते. या धारणेमुळे आत्मगंडयुक्त चित्ताची विपन्नावस्था नाहीशी होते. ईश्‍वरीय प्रेमाची अद्वितीय भावनाच ऋजुता आहे ! ती प्रकट होते. त्या व्यापक अहंतेमध्ये त्या भगवंताचे अवतरण होते.
    भक्तिगंगेच्या तिरावर आलेला शरणागत उपासक सद्गुरुंच्या साक्षीने त्या गंगेच्या प्रवाहावाबरोबर स्वत:ला सोडून देतो. या समर्पणाला बुद्ध स्रोतापन्न होणं म्हणतात. अर्थात हे समुद्राच्या आकांक्षेने नसते तर ते वाहणंच लक्ष असते. आता कुठे पोहोचण्यासाठी हे तरंगत वाहणे नसते.
    शरणागत भाव मंदिराचा अत्युच्च कळस म्हणजे समर्पणता ! अर्थात त्यात समत्व भावनेने अर्पण होणे हा भाव अंतर्भुत असतोच. आता सुखदु:खाच्या भावनीक आवाहनाला उपासक भगवंताप्रति समर्पित करत राहतो. कारण योगभ्रष्टतेची आत्मपीडा त्याला मिटवायची असते. त्याची ही भोगभावनेप्रति उपेक्षा शुष्क नसते तर समर्पित असल्याने उत्साहमय असते. ऐलतीरावरील भोगमय अभ्युदयाचा सुखसोहळा अनुभवल्यावर आलेला तो वीतराग असतो. त्याला पैलतीरावरचा अकारण आनंदसोहळ्याचा वैकुंठ खुणावत असतो. त्याला त्या भोगाविषयी आसक्तीही नसते वा क्रोधही नसतो, यालाच कृष्ण अनासक्त योग म्हणतात.
    त्या उपासकाचे अंधाराशी भांडण मिटलेले असते कारण तो प्रकाशाचा पांथस्थ झालेला असतो. अर्थात तो अंधार आहे ही व्याख्याही आता त्याच्या चित्तात उमटत नसते ! कारण ईश्‍वरप्रेमातच तो क्षणाक्षणाला उगवत राहतो. असे अंतरीचे रसार्जन दिव्य आहे.
    श्रीकृष्णार्पणमस्तु !
लेखकु - दामोदर प्र. रामदासी

मय्यर्पित मनोबुद्धि : समर्पणकी कसोटी और कर्मसंन्यास (हिंदी)

मय्यर्पित मनोबुद्धि :
समर्पणकी कसोटी और कर्मसंन्यास (हिंदी)

    आत्मदानकी दिव्यता याने समर्पण भाव। समर्पण याने भगवंत के प्रति सर्वोच्च अविचल स्थिती। समृद्ध प्रगतियान।
    यतोऽअभ्युदय नि:श्रेयस सिद्धी स धर्म:॥ अभ्युदय अर्थात प्रापंचिक एवं नि:श्रेयस अर्थात पारमार्थिक सर्वोच्च लब्धता याने धर्म पर इस पुरुषार्थ के लिए चाहिए संपूर्ण समर्पण कि चित्तस्थिती। समर्पण कि भावना जीवन को लक्ष्य बनाती है और लक्ष्य एवं लक्षवेधी दोनों को ही दिव्यता प्रदान कराती है। यही है भगवंत के प्रति भागवत आत्मनिवेदन या अव्यभिचारी प्रेम ! वेद जिसे यज्ञ कहते है, उसे अध्यात्म में भक्ति कहते है। समर्पण शब्द यह सर्व भावयुक्त है। अर्थात यज्ञ प्रवृत्ती में अभिलाषा होती है, यह विचार अलाहिदा ! जो भक्ति में या समर्पण में नहि होता।
    मय्यर्पित मनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्॥गीता 8.7॥- अर्थात मुझे मन एवं बुद्धी अर्पण करो, ऐसा तु मुझेही प्राप्त हो जाएगा, इस में संशय नहि।
    संशय मत रख इन शब्दो में भगवान प्रतिज्ञतापूर्वक यह बात कह रहे है यह सुनिश्‍चित हो जाता है।
    प्रतिज्ञतापूर्वक यह शब्द सृष्टीका सनातन नियम है, यह शब्द अंतिम सिद्धांतरुप है। इस कारण इस समर्पण होनेवाले की भावदशा को अपनेआप महत्त्व प्राप्त हो जाता है।
    यत्करोषि यदश्‍नाचि यज्जुहोषि ददासि यत्। यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्॥ गीता 9.27॥ अर्थात होनेवाली प्रत्येक क्रिया में ईश्‍वरार्थ धारणा रखना यह समर्पण का प्रथम पाठ है। कारण जिसके प्रति समर्पित होना है, वह पदार्थ भी व्यापक एवं पूर्ण चाहिए। आधेअधुरे पदार्थों के प्रति समर्पित होना याने वैसे ही गुण समर्पित होनेवाले चित्त में प्रकट हो जाएंगे यह बात गौर करने लायक है।
    इस कारण समर्पित होते समय चित्त किस दशा मे चाहिए ? 1) भगवान ने मुझे उसे जैसा चाहिए वैसाही बनाया हुआ है, और उतनाही मुझे दिया है। 2) जो दिया है वह उसके लिए और मेरी सामर्थ्य देखकर मुझे दिया है। वह दिया हुआ कितना चाहिए यह तय करने का अधिकार मुझे नहि है और वैसी वासना भी मुझे नहि रखनी चाहिए । और दिया हुआ मुझे उसके लिएही उपयोग करना है। 3) जैसे फुलो में सुगंध, वायु में बहने का गुण उसने दिया है, तब फुलने वायु होने की अपेक्षा रखना या वायु ने फुल होने का हट करना गलत है और भगवान के इच्छाप्रति अप्रसन्न होने जैसा है। ऐसी चित्त कि स्थिती में समर्पण का पतन हुआ है ऐसा समझना उचित होगा। उसने दि हुई सामर्थ्य से उसके प्रति समर्पित होना ही प्रसन्नता का रहस्य है।
    4) अपने प्रति अज्ञान का या कमदर्जे का भाव या अपराधवृत्तीकी ग्रंथी यह पारमार्थिक गुनाह है। कर्मवृत्तिका त्याग या निवृत्ती यह ढोंग हो जाता है कारण वैसी कृती अर्थात भगवान ने जो मेरे लिए कार्य बनाया है उसके प्रति नाखुष होने जैसा है। और उन कर्मों के माध्यम से भगवान को मेरा समर्पण का भाव चाहिए था उस भाव को जैसे मै ही उखाड के फेंक रहा हूँ । इस कारण जो कर्म मुझसे हो रहे है वह मेरे माध्यम से वह कर रहा है और उसे ही समर्पित हो रहे है ऐसी भावदशा ईशपूजा है। 5) इस कारण उन सारे कर्मों के प्रति अखंड प्रसन्नभाव और उत्साह अगर चित्त में चोबीसो घंटे है तो भगवान मुझ पर खुष है ऐसा समझना चाहिए।         बाह्य कर्मों के साथ मन (संकल्प एवं भोग), चित्त (आस्था), बुद्धी (स्मृति एवं गति) और अहंकार (अभिमान एवं अस्मिता) यह सारी अंतरीय शक्तियाँ ईश्‍वरार्थ उपयोग में लाना यह बात स्वाभाविक हो जाती है।
    चित्त मे समाधान के साथ, अनंत ने मुझे जैसा रखा है मैं वैसा ही रहुँगा - संत तुकाराम कि इस वाणी में रखने कि संकल्पना कि गहनता चिंतनीय हो जाती है।
    संसार कि इस क्रिडा में सोंपा गया काम औरों की सहायता से यथासंभव करना पडता है, ऐसे में किसी खिलाडी ने अगर उस कार्य को टाल दिया तो उस क्रिडा का आनंद समाप्त हो जाता है। ऐसे खिलाडी को आनंद भी चाहिए पर कार्य के बीना। ऐसे खिलाडी खेल को बिगाड देते है या उस खेल से अलग हो जाते है। ऐसे जीवों को तथाकथित कर्मसंन्यासी कहते है। इनको आनंद कि तो वासना है पर खेल नहि चाहिए। एक प्रकारसे भगवाननिर्मित क्रिडा में यह तो अपराधी सिद्ध हो जाता है। क्योंकी उसने उस खेल को ही झुटा समझा है।
    संत ज्ञानेश्‍वर (भक्तों कि मां) गीतापर टीका करते समय, जब तक देह है तबतक कर्मत्याग अशक्य आहे यह बात पुरे जोरसे कहते है- और इन पांच कारणों से कर्म घटीत होता है ऐसे कहते है- देह, कर्ताजीव, विभिन्नइंद्रिये, कर्तृत्वशक्ति और दैव-देवोंका समुदाय। कर्मसंन्यास वही है जिस में अहंकार रहित ईश्‍वरार्पण या सद्गुरुर्पणका भाव है।
    अहं-बुद्धि-चित्त के प्रति नकारात्मक भाव छोडकर उन्हे ईश्‍वर के प्रती जुडाकर रखना और जो जो मेरे कार्य है उन्हे उस ईश्‍वरप्रति समर्पण करना यह भाव ही कर्मसंन्यास है।
    स्वामी विवेकानंद कहते है यह संसार याने शाला का बडा मैदान है। और हम उस शाला में जानेवाले बच्चों को उसपर खेलने के लिए छोडा गया है। ऐसी बुद्धी आनेपर फिर इस जगत में हसने के या खिलाडुवृत्ती के अलावा क्या हात में रह जाता है। ऐसे में हमारे माध्यम से खेलने वाला भी वह और खेल भी वह । इस कारण पकडने लायक क्या रह जाता है ? इस खेल को हि संत ज्ञानेश्‍वर चिद्विलास कहते है।
    भोगविषयों के प्रति आसक्ति कि भावनांओं को अपेक्षा प्रेम कि भावना महत्त्वपूर्ण है । भोग भी वही है। अहं भावनांओं के प्रति अपराधभाव पकडने कि अपेक्षा उसे व्यापक स्वरुप देना उचित है। लोभ भी उसका, दंभ भी वही, मोह में मोहन ही वही। ऐसी स्थिती में षड्विकारों के प्रति यह विकार है ऐसी भावना जाकर षडभावयुक्त ऐसा मै वहि हूँ ऐसा व्यापक भाव उतर आता है। इस धारणा के कारण आत्मगंडयुक्त चित्त कि विपन्नावस्था समाप्त होती है। ईश्‍वरीय प्रेम कि अद्वितीय भावना ही ऋजुता है ! वह प्रकट हो जाती है। उस व्यापक अहंता में उस भगवंत के अवतरण हो जाते है।
    भक्तिगंगा किनारे आया हुआ शरणागत उपासक सद्गुरु के सामने उस गंगा के प्रवाह के साथ अपने आपको बहा देता है। इस समर्पण को बुद्ध स्रोतापन्न होना कहते है। अर्थात यह समुद्र की आकांक्षा के लिए नहि है वरन् वह बहना हि लक्ष है। पहुँचने के लिए यह बहना नहि होता ।
    शरणागत भाव के मंदिर का शिखर याने समर्पण भाव ! अर्थात उसमे समत्व भावना के साथ अर्पण होना उस भाव के अंतर्निहित है। अब सुखदु:ख कि भावनाओं का आवाहन उपासक भगवंत के प्रति समर्पित करता रहता है। कारण योगभ्रष्टताकी आत्मपीडा उसे मिटानी होती है। उसकी यह भोगभावनाओं के प्रति उपेक्षा में शुष्कता नहि होती वरन् समर्पित भाव होने के कारण वह उत्साहमय होता है। इस किनारे पर भोगमय अभ्युदय का सुख उत्सव मनाने के बाद आया हुआ वह वीतराग होता है। उसे उस किनारे का अकारण आनंदउत्सव का वैकुंठ बुला रहा है। उसे उस भोगविषय के प्रति आसक्ती भी नहि होती और क्रोधही भी नहि आता, इसेहि कृष्ण अनासक्त योग कहते है।
    अब उपासकका अंधेरे के साथ झगडा समाप्त हो चुका है, कारण अब वह प्रकाश पथ का पांथस्थ बन चुका है। अर्थात वह अंधेरा है ऐसी व्याख्या भी उसके चित्त में प्रकट नहि होती ! कारण ईश्‍वरप्रेम मे हि क्षणक्षण वह उगता रहता है। ऐसा यह भीतर का रसार्जन दिव्य है।
गुमशुदि से अब तो पाला पड गया है इश्क का।
रहनुमा गुमराह दोनों की खतम है राह अब॥रहिमन॥
    श्रीकृष्णार्पणमस्तु !
लेखक - दामोदर प्र. रामदासी

Wednesday, July 13, 2016

विरक्त जाला संसारी । या नाव मुमुक्षु॥ (मराठी)

विरक्त जाला संसारी । या नाव मुमुक्षु॥ (मराठी)
मुमुक्षे चे तीन स्तर


    आपण धावतो पुष्कळ पण पोहचत मात्र नाही. आयुष्याचा हिशेब मांडायला बसल्यावर संसाराच्या चारदोन काटक्यांशिवाय हाती काही लागत नाही. आतमध्ये खोलवर रिक्तता जाणवते आणि आयुष्याची संध्याकाळ म्हणजे पश्‍चात्ताप आणि.... भय इथले संपत नाही ही भयंकर अवस्था !
    या भवसागराच्या भोगतटावर युगानुयुगे शांतिसमाधानाची भीक मागत जीव उभा राहिला. आशा निराशेच्या द्वंद्वांची फसवणुक अव्याहतपणे भोगीत तो अभिलाषेने तिष्ठत होता ! भोगसुखाच्या ओलाव्याने अनेकदा शहारलाही, पण अंतरंगी शुष्कता अनुभवत गेला ! अनंत काळ ओसरला, पण शांतीची गुणगुण, सुखाची रुणझुण अनुभवली नाही आणि पश्‍चात्ताप वाटु लागला- जाला प्रपंची उदास। मने घेतला विषयत्रास। म्हणे आता पुरे सोस। संसारीचा॥दा. 5.8.4॥ असं कुठल्यातरी वळणावर वाटु लागतं. या भावनेनं त्याचं मन व चित्त संपृक्त होतं.
    समीपवर्ती विषयांशी तादात्म्य पावणारं, संस्कारबद्ध, स्मृतिमय, जड, वस्तुनिष्ठ असं मन हे वस्तुतंत्र आहे तर कोणत्याही काळी व स्थळी भावनिष्ठेशी एकरुप होणारं, वृत्तिविशेष असं चित्त हे द्रव्यतंत्र आहे.
    अशा त्या चित्तात दुसर्‍या किनार्‍याचं आकर्षण वाटु लागतं, बद्धतेच्या शृंखला मोडून मुक्त व्हायला ते आसुसतं आणि सुरु होतो प्रवास. त्या सत्यशोधक चित्तात सुरुवातीला असलेली कुतुहुलाची भावना संदेहमय असते. पण धक्केचपेटे सोसलेलं ते बिच्चारं या अज्ञाताच्या कृष्णविवरात उतरायला तयार होतं ही त्या अनंताचीच कृपा ! ते कधी भरकटतं, जिज्ञासेपोटी प्रश्‍नही विचारत बसतं.  पण अर्थात या कुतुहुलाने का कोठे तो भगवंत भेटतो.
    अर्थात पुढे वारीचे सातत्य सुरुच राहते. पावलं चालत राहतात. उन पाऊस झेलत, तीव्र जिज्ञासा थांबु देत नाही. बौद्धिक पांडित्य अंतर्ममनाचा गाभा व्यापेलही पण तेवढ्याने भागणार नाही. जो पर्यंत तो वारकरी उपासक मस्तकाशी संबंधीत आहे तो पर्यंत विठ्ठल दूरच. पण सद्गुरुकृपेनं चालणं काही थांबत नाही. मग शेवटी परेच्या गहनतेत चेतना उतरते, विठ्ठल जीवनमरणाचा प्रश्‍न होऊन जातो. विठ्ठलाला उपासक ‘संपूर्ण’ हवा असतो. केवळ डोक्याने नाही तर हृदयासकट.
    मस्तकातून हृदयात उतरणारा तो बद्ध मुमुक्षु उपासक होतो. अनासक्त व्हायची तीव्र भावना म्हणजे मुमुक्षा ! संसारचक्रातून सुटण्याची धडपड म्हणजे मुमुक्षा ! पण यातही सुरुवातीला उपासनेमध्ये एकतृतीयांश शक्ति तो पणाला लावतो कारण जुने संस्कार मागे ओढत राहतात. काहीसं यश पदरी पडलं असं वाटतं. असा उपासक अस्वस्थ नसतो पण शांतही नसतो. संसारापासून सुटलेला पण परमार्थ न गवसलेला अशी सैराट अवस्था असते ! सत्प्रवृत्त पण निस्तेज ! काटे गळुन पडलेले आहेत पण फुलं उमलली नाहीत अशी ही चिडचिडी अवस्था मिळालेला, त्याच्याकडे पाहिल्यावर त्यानं काहीतरी मिळवलेलं आहे हे जाणवतं पण तरीही काहीतरी कमी आहे असं वाटत राहतं. यांच्या सान्निध्यात, हे आपल्यावर चिडणार नाहीत पण क्षमाही करणार नाहीत. ते आपल्याला शोषून घेतील. अनेक संन्याशांबाबत हे अनुभवायला येतं. या इयत्तेतल्या तिबेटी लामाला गावात फिरकु देत नाहीत. हिमालयात हिंदु संन्यासालाही झाडाला हातही लावु देत नाहीत. कारण यांच्या स्पर्शानं झाडं मरतात. अशा लामा व संन्याशांसाठी एकांतातले वेगळे मठ असतात. एखाद्या बेटासारखे एकांडे या उपासकांची मोक्षाची इच्छा मृदु असते असं पतंजली म्हणतात. मृदुमध्याधिमात्रत्वात्ततोऽपि विशेष:॥ समाधीपाद 1.22 ॥ अर्थात मृदु, मध्य व तीव्र या तीन अवस्था आहेत.
    पण त्या वारीत संत समागम त्याला प्रेरीत ठेवतो. मार्ग दाखवतो. संतांचे संगती मनोमार्ग गती। (ज्ञानेश्‍वर 744. हरिपाठ) आणि         वारी पुढे चालुच राहते. मग उपासनेमध्ये दोन तृतीयांश शक्ती लावणारा मुमुक्षु उपासक थोडी भर पडल्यासारखा पर्वतशिखरासारखा शांत होतो. चंचल मनोदशा स्थिर होते. त्याच्या सान्निध्यात ती शांती आपल्यालाही वेढुन टाकते. बागेत गेल्यावर फुलांचा सुगंध येतो तसं होतं. तो वाळवंटातून हिरवळीवर आल्यासारखा असतो आणि हे अक्षरश: जाणवतं. पण निगुढ शांतीही अवगुंठनासारखीच असते. तिथे सळसळता उत्सव नसतो, चिद्विलास नसतो ! पतंजली याला मध्य मुमुक्षा म्हणतात. पण ती शांतीही आता परमानंदमय पंढरपूर इथे जवळच कुठेतरी असल्याचं द्योतक ठरते.
    पण मुमुक्षेच्या शेवटच्या स्थित्यंतरात सर्वस्व ओतले जाते. वारीच्या वाटेवरला ‘धावा’ आता तीव्र होतो. या धुंदीनं आपोआप नर्तन असलेलं कीर्तन सुरु होतं, वेडपीसं ! आत चंद्रभागा ओसंडून वाहु लागते व तो त्यात तो सुस्नात होतो. या आनंदाची चिन्ह म्हणजे भक्तिरुपी गोपीचंदनाचा टीळा आणि वैराग्यरुपी बुक्का त्याच्या भाळी लागतो. या आनंदाचं वर्णन करावं तरी कसं?
    एकादशीला एकच दशा लाभलेला भक्त विठ्ठलाच्या पूर्वेकडील महाद्वारात उभा आहे, दर्शन करुन पश्‍चिम द्वाराने त्याला बाहेर पडायचं आहे. सद्गुरु त्याला पश्‍चिम द्वाराकडे अर्थात निर्गुणतेकडे नेत आहेत. पश्‍चिमेंचे जे क्षितीज आहे ते हृदय आहे. चित्कला जगदंबा कुंडलिनी हृदयचक्रात येताच आपला अहं असलेला स्वरुपभाव अस्ताला नेते व तिथे तिचे स्वरुप भक्तवर मारुति ‘विरलोदय भाव’ या संज्ञेला प्राप्त होते. म्हणून मारुति तत्त्व भक्तिच्या प्रदेशात महनीय आहे.
    समर्पणाचा भाव ही जिथे समर्पित होतो अशी एकच दशा म्हणजे एकादशी ! या एकादशीला ती ‘मारुती’ दशा प्राप्त होण्यासाठी महाद्वारात आता उभा असलेल्या भक्ताला पश्‍चिमद्वाराकडे जाताना मध्ये पितांबर परिधान केलेले, कटीवर हात व ज्यांचे कोमल नेत्रद्वय चरणांकडे झुकलेले आहेत, कारण तो भक्त सर्वभाव वा अगदी शेवटचा राहिलेला सूक्ष्म अहंकार, अस्मिता, वा परत परत जन्माला घालणारी बीजे, त्या पायांपाशीच समर्पित करतो, त्या भक्ताच्या सबीज समाधीचे हे कौतुक पाहणारे भगवान विठ्ठल त्याला भेटतात. तो सावळा सगुण परमात्मा भक्ताला पश्‍चिमेकडे जाण्याआधी मध्येच अडवतो आणि प्रेमाच्या गोष्टी दोघांत सुरु होतात.
    खरं तर तो पश्‍चिम द्वारीचाच निर्गुण परमात्मा अखंड वारीरुपी तपश्‍चर्या करुन आलेल्या, थकलेल्या भक्ताला आलिंगण्यास सगुणरुपात धावत धावत येतो. तोपर्यंत भक्तही गाभार्‍यापर्यंत पोहोचलेला आहेच. त्या राउळात भक्ताला भगवंत कवटाळतो. हेच ते भगवान विठ्ठलाचे राउळ अर्थात भक्ताच्या हृदयातील सगुण दर्शन होय ! बरं या भगवंताला हे असं कवटाळल्याशिवाय पश्‍चिमद्वारांवर जाता येत नाही ! कारण ते द्वार पिछाडीला आहे.
    हे समस्तही श्रीवासुदेवो। ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो। म्हणौनि भक्तांमाजी रावो। आणि ज्ञानिया तोचि॥ज्ञा.7.136॥ हा एकात्म, सोलीव सुखाचा लाभ झालेला उपासक गाऊ लागतो- सोलीव ते सुख अति सुखाहुनी। उभे ते अंगणी वैष्णवांच्या॥तुकाराम 323॥
    सद्गुरु हा सर्व सोहळा पार पडेपर्यंत तिथे असतातच.
      मग उपासक अभक्त होऊ शकत नाही असा भक्त होतो. तो भक्त म्हणजे विश्‍वाचा प्रसन्न प्रभव ! तो भक्त म्हणजे विश्‍वप्रेमाचा सजीव साक्षात्कार ! त्या राऊळात त्याची वारी सुफल संपूर्ण जाहली !
जय हरी विठ्ठल !
लेखक - दामोदर प्र. रामदासी

तेरा तो यहाँ कछु नहीं रे। रामदास कहे ॥ (हिंदी)

तेरा तो यहाँ कछु नहीं रे। रामदास कहे ॥ (हिंदी)
मुमुक्षा के तीन स्तर

    हम भाग रहे है पर कही पहुँचते नही। जीवनका हिसाब करते समय संसारके चार-दो सुख दुख की बातोंसिवाय हात क्या लगता है ? भीतर गहनता में एक रिक्तता अनुभव में आती है। जीवनका संध्या समय याने पश्‍चात्ताप लगता है और ... डर कभी समाप्त नही होता।
    इस भवसागर के भोगतटपर अनेक युगोंसे शांति-समाधान की भीक मांगता हुआ जीव खडा है। आशा और निराशा के द्वंद्व फसां रहे है, सतत फसता हुआ जीव अभिलाषासे खडा है ! भोगसुख से भिगोया हुआ जीव ना जाने कितनी बार रोमांचित नही हुआ ? पर भीतर रुखेपन को अनुभव करता है। अनंत समय गया, पर शांतीके स्वरोंकी गुनगुन, सुख की रुणझुन अनुभव में नही आयी और पश्‍चात्ताप लगने लगा। अब बस बहुत हुआ ! इस भावनासे उसका मन और चित्त भर गया।
    वर्तमान स्थिती के विषयों से तादात्म्य होनेवाला, संस्कारबद्ध, स्मृतिमय, जड, वस्तुनिष्ठ ऐसा मन यह एक वस्तुतंत्र है और किसी भी समय और जगह में भाव के साथ एकरुप होनेवाला, वृत्तिविशेष ऐसा चित्त यह द्रव्यतंत्र आहे ।
    ऐसे चित्त को दुसरे किनारे का आकर्षण लगने लगता है। बद्धता की शृंखलाओं को तोडकर मुक्त होने के लिए वह तडपता है और फिर शुरु हो जाती है एक यात्रा । उस सत्यशोधक चित्त में शुरुआती कौतुहल की भावना संदेहमय होती है, पर मारापीटा गया वह बेचारा मन इस अज्ञात के कृष्णविवर में उतरने को राजी हो जाता है यह भी उस अनंत की ही कृपा है ! वह कभी भटकता है, जिज्ञासा के आहोश में अनेक प्रश्‍नही पुछता है पर केवल कौतुहल से क्या भगवंत मिलता है ?
    विठ्ठल की दिशा में उसकी वारी याने यात्रा चालु रहती है। पाँव रुकते नही। गरमी, बारीश सहन करता हुआ, तीव्र जिज्ञासु चलता रहता है। बौद्धिक पांडित्य अंतर्मन को व्याप्त करता है पर उससे क्या होगा ? जबतक वह वारकरी, उपासक मस्तक से संबंधीत है तबतक विठ्ठल दूरही है। पर सद्गुरुकृपा से चलना रुकता नहीं। अंत में गहनता में चेतना अवतीर्ण होती है। विठ्ठल जीवनमरण का प्रश्‍न बन जाता है। विठ्ठल को उपासक ‘संपूर्ण’ चाहिए। आधाअधुरा नही। केवल मस्तिष्क से नही वरन हृदय के साथ चाहिए।
    मस्तक से हृदय में उतरनेवाला बद्ध मुमुक्षु उपासक बन जाता है। अनासक्त होने की तीव्र भावना याने मुमुक्षा ! संसारचक्र से बाहर छुटनेकी छटपटाहट याने मुमुक्षा ! पर इस में भी शुरुआती दौर में वह एकतृतीयांश शक्ति ही लगाता है। क्यों की पुराने संस्कार छुटे नही छुटते, कुछ सफलता हात लगी है ऐसा लगता है। ऐसा उपासक अस्वस्थ नही होता पर शांत भी नही होता। संसार से छुटा हुआ पर अभी परमार्थ भी नही मिला है ऐसी स्थिती उसकी बनी रहती है। सत्प्रवृत्त पर निस्तेज ! काटे निकल गए पर फुल अभी खिले नही ऐसी संतप्तग्रस्त भावदशा में वह आ जाता है। उसे देखकर यह तो पता चल जाता है की थोडा कुछ तो मिला है पर यह भी पता चलता है की अभी कुछ मिलना भी बाकी है। उसके सान्निध्य में, वह चिढता नही पर क्षमा भी नही करता। ऐसा उपासक हमारी ऊर्जाका शोषण करता है। ऐसे अनेक संन्यासीयों के बारे में अनुभव में आता है। ऐसी अवस्था के तिबेटी लामा को गाव में आने नही देते। हिमालय में इस अवस्था के हिंदु संन्यासी को वृक्ष को स्पर्श नही करने देते। कारण वह वृक्ष उस स्पर्श से मर जाता है।  ऐसे लामा और संन्यासीओं के लिए एकांत में अलग मठ बनाए जाते है। समुद्र के अकेले द्वीप के समान ऐसे उपासकोंकी मोक्ष की भावना शुरुआती दौर में मृदु होती है ऐसे पतंजली कहते है।- मृदुमध्याधिमात्रत्वात्ततोऽपि विशेष:॥ समाधीपाद 1.22 ॥ अर्थात मृदु, मध्य और तीव्र यह तीन अवस्थाँए है ।
    पर उस वारी में याने अंतर्यात्रा में संत समागम उसकी प्रेरणा बन जाता है। उसे मार्ग दिखाता है। संतांचे संगती मनोमार्ग गती। (ज्ञानेश्‍वर 744. हरिपाठ) और वारी आगे चलती रहती है। फिर उपासना में दो तृतीयांश शक्ती लगानेवाला मुमुक्षु उपासक बाद में पर्वतशिखरों जैसा शांत होता चला जाता है। चंचल मनोदशा धीरेधीरे स्थिर होती जाती है । उसके सान्निध्य में वह अद्भुत शांती हमें भी विभोर कर देती है। जैसे बगीचे में फुलोंकी सुगंध आती है वैसे । जैसे वह रेगिस्तान से हरियाली में आया हुआ हो। और इसकी अक्षरश: प्रतीती हमे आती है। पर यह रहस्यमयी शांती भी घुँघट के समान होती है। जैसे कुछ अभी भी छुपा हुआ हो। वहा रसधार या उत्सव नही होता, चिद्विलास नही होता ! पतंजली इसे मध्य मुमुक्षा कहते है। पर वह शांती भी अब परमानंदमय पंढरपूर यही कही पास में है इसका प्रतीक होती है।
    मुमुक्षा के अंतीम अवस्था में सर्वस्व का समर्पण हो जाता है। उस यात्रा के अंतीम पडाव की दौड तीव्र गतीसे शुरु हो जाती है। इसी नशा में अपनेआप नर्तन और कीर्तन शुरु हो जाता है। किसी पागल के समान धुंद! भीतर की चंद्रभागा नदी तुफान मचा देती है। उसी में स्नान कर वह वारकरी उपासक सुस्नात हो जाता है। इस आनंद के चिन्ह याने भक्तिरुपी गोपीचंदन तिलक और वैराग्यरुपी काले रंगका टीका उसके भालप्रदेश की शोभा बन जाता है। इस आनंद का वर्णन करु तो कैसे करु?
    एकादशीको एकही दशा याने अवस्था का लाभ हुआ भक्त भगवान विठ्ठल के मंदिर के पूर्व दिशा के महाद्वार में खडा है, दर्शन करके उसे पश्‍चिम द्वार से बाहर जाना है। सद्गुरु उसे पश्‍चिम द्वार से अर्थात निर्गुण अवस्था की ओर ले जा रहे है। पश्‍चिम का क्षितीज तो हृदय है। चित्कला जगदंबा कुंडलिनी हृदयचक्र में आते ही ‘अहं’ का भाव अस्त हो जाता है, और वहा उसका स्वरुप भक्तवर हनुमानजी ‘विरलोदय भाव’ इस संज्ञा को प्राप्त हो जाता है। इस कारण हनुमान तत्त्व भक्ति के क्षेत्र में महत्वपूर्ण है।
    समर्पण का भाव जहाँ समर्पित हाता है ऐसी एकही दशा याने एकादशी ! इस एकादशीको वह ‘हनुमान’ दशा प्राप्त होने के लिए महाद्वार में खडे उस भक्त को पश्‍चिमद्वार की ओर जाते समय बीच में पितांबर परिधान किए हुए, कटीपर हात और जिनके कोमल नेत्रद्वय चरणों की ओर झुके हुए है, कारण वह भक्त सर्वभाव या अंतिम अवस्था का बचा हुआ सूक्ष्म अहंकार याने अस्मिता, या पुन:पुन: जनम देनेवाले बीज, उन चरणों में समर्पित करता है, उस भक्त की सबीज समाधी का यह लाडदुलार देखनेवाले भगवान विठ्ठल मिल जाते है। वह सांवला सगुण परमात्मा भक्त को पश्‍चिम की ओर जाते समय बीच में ही रोकता है, और प्रेमपूर्ण संगोष्ठीयाँ दोनो में होने लगती है।
    वैसे देखा जाए तो पश्‍चिम द्वार का वह निर्गुण परमात्मा अखंड वारीरुपी तपश्‍चर्या करके थकेमाँदे भक्त को आलिंगन देने के लिए सगुणरुप में दौडता हुआ आता है। तबतक वह भक्त भी गर्भगृहतक आ जाता है। उस मंदिर में भक्त को भगवान आलिंगन देते है यही है भगवान विठ्ठल का राउळ याने मंदिर अर्थात भक्त के हृदय में हुआ सगुण दर्शन ! और इस आलिंगन के बिना पश्‍चिमद्वार तक भक्त नही जा सकता। ! कारण वह द्वार पिछे की ओर है। सद्गुरु इस उत्सव को देखते हुए वही खडे रहते है।
      फिर वह उपासक अभक्त नही हो सकता ऐसा भक्त बन जाता है। वह भक्त याने विश्‍व की प्रसन्न अभिव्यक्ति ! वह भक्त याने विश्‍वप्रेम का सजीव साक्षात्कार ! उस मंदिर में उसकी वारी याने उपासनाकी यात्रा सुफल संपूर्ण हो गयी !
जय हरी विठ्ठल !
लेखक - दामोदर प्र. रामदासी