Monday, July 4, 2016

गुरु, सद्गुरु आणि परमसद्गुरुचे न उलगडणारे रहस्य (मराठी)

गुरु, सद्गुरु आणि परमसद्गुरुचे न उलगडणारे रहस्य


I am a voice without form स्वामी विवेकानंदांच्या या वाक्यात एक गहन सत्य लपलेलं आहे. आश्‍वासन आहे. व्यक्तिगत चेतनेचा अंतिम अविष्कार म्हणजे ईश्‍वर. दगडही ईश्‍वर होण्याच्या मार्गावर आहेत. भारतातील अध्यात्मिक धारणा हीच आहे की ईश्‍वर निर्माण कर्ता यापेक्षा अस्तित्वाचा अंतिम कळस आहे. आपल्याकडे कळसाचही दर्शन घेतात. ते कदाचित त्याचंच प्रतिक असावं. बीजरुपातला तो ईश्‍वर कधीनाकधी उमलतो. मोगरा फुलला, मोगरा फुलला ! या अपरोक्षानुभूतिनंतर त्या सिद्धाच्या अस्तित्वाने आसमंत दरवळतो. इतरेतर सामान्यजन जे त्या उमलत्या अस्तित्वाच्या सान्निध्यात येतात तेही सुगंधीत होतात. त्यांनाही ईश्‍वर व्हायला तो मदत करतो. असा तो सद्गुरु हा प्रकट ईश्‍वर आहे.
    गुरु तीन प्रकारचे- पहिला गुरु तो की जो विद्येची आस असणार्‍याला विद्येचे दान देतो. तो विद्यागुरु वा शिक्षक. हा केवळ ज्ञान देतो पण अस्तित्व नाही. तो मस्तकात केंद्रीभूत व्हायला शिकवतो. ‘जे जाणल्याने सर्वच जाणलं जाते ते शिकलास का ?’ पिता उद्दालक गुरुकुलातुन शिक्षण पूर्ण करुन घरी अंगणात प्रवेश करणारा आपला पुत्र श्‍वेतकेतुला हा प्रश्‍न विचारतो. तेव्हा त्याचं उत्तर मिळवण्यासाठी परत आश्रमात आलेल्या आपल्या विद्यार्थ्याची जिज्ञासा ऐकुन, अज्ञानाच्या एकाच नावेत बसलेले ते विद्यागुरु श्‍वेतकेतुपुढे केवळ विधीच सांगतात व आपण ते जाणत नाही आहोत ही प्रांजळ कबुली देतात. तेव्हा श्‍वेतकेतू ते जाणण्यासाठी जंगलात निघून जातो.
    ‘हि विद्या शिकुन मी काय करु ? केवळ पोटभरु असं बाह्य पदार्थ वा विषयांच्या ज्ञानापेक्षाही अधिक किंमतीचं ते मला जाणायचं आहे’ असं आपल्या मोठ्या भावाला शाळेत मी का जात नाही याचे कारण सांगणारे गदाधर वा रामकृष्ण परमहंस शैक्षणिक विद्येपेक्षा अधिक महनीय असं काही आहे हे जाणत असतात.
    विद्यार्थी हा माहितीच्या शोधात असतो तर शिष्य रुपांतरणाच्या !
    अधिक किंमतीचं, जे जाणल्यानं सगळंच जाणलं जातं ते शिकणं अधिक महत्त्वाचं आहे किंबहुना आयुष्याचं सार आहे आणि ते शिकवण्याची जबाबदारी घेतात ते सद्गुरु जे देह धारण करुन असतात.
    ‘होय ! मी त्याला पाहिलं आहे. जसं मी तुला बघतो अगदी तसंच. किंबहुना याही पेक्षा सुस्पष्टपणे. काय तुला त्याला बघायचंय ?’ असा आत्मविश्‍वास पूर्वक म्हणणारा साधु नरेंद्राने यापूर्वी कधीच बघितला नव्हता. आणि हा आत्मविश्‍वास सार्थ करणारा स्पर्श त्याला त्या गुरुकडुन मिळाला आणि आयुष्य बदललं. तो स्रोतापन्न झाला ! निर्विकल्प समाधी नंतर नरेंद्रनाथ हेच म्हणाले की ‘त्यांनी मला दाखवलं ! मी माझाच चेहरा बघितला !’ पुढे तोही पुढे त्याच सद्गुरुंच्या अढळस्थानी कारुण्यानं बसलाही. ते सद्गुरु म्हणजे रामकृष्ण परमहंस व तो नरेंद्रनाथ म्हणजे स्वामी विवेकानंद.
    आम्हाला तुम्ही काही शिकवाल का ? असं एकानं रमण महर्षींना विचारलं तर ते म्हणाले, नाही ! मी शिकलेलं विसरायला लावतो ! असे सद्गुरु त्या बालकवत समर्पित शिष्याला त्याचं भान द्यायला उत्सुक असतात. त्यानं गोळा केलेला कचरा साफ करतात. त्याला त्याचाच चेहरा दाखवतात. असे सद्गुरु अस्तित्व देतात ज्ञान नाही. ते विकेंद्रित शिष्याला केंद्राकडे नेतात. ते मस्तकातून उपटून काढतात. दुसरीकडे पुनररोपण करतात. कदाचित ते सुरुवातीला पीडादायक असतं, ते उपटणं, पानं गळणं, मातीत मुळांचा जम बसणं सारं वेदनादायी, प्रसुती वेदने सारखं पण तो शिष्य वटवृक्ष होतो. त्याचा नवीन जन्म झाला कि तो द्वीज होतो. ब्राह्मण होतो! सॉक्रेटीस म्हणायचे मी सुईण आहे. आणि ते खरं आहे कारण सद्गुरु अहम च्या मृत्यु नंतर अस्तित्वाचे भान देणार्‍या नवीन जन्माच्या प्रसुतीत मदत करतात.
    परीस आपणाऐसें करीना। सुवर्णें लोहो पालटेना।उपदेश करी बहुत जना। अंकित सद्गुरुचा॥दा.1-4-15॥ परिस लोखंडाचे सोने करतो पण ते सोने लोखंडाला सोनं बनवत नाही पण सद्गुरु कृपा झालेला उपासक मात्र अनेकांचा उद्धारकर्ता होतो.
    पूर्वेषामपि गुरु: कालेनानवच्छेदात् ॥पातंजलयोग, समाधीपाद-26॥ अर्थात काळाच्या पलिकडे असल्यामुळे तो गुरुंचा गुरु आहे, परमसद्गुरु आहे. सद्गुरु जेव्हा देह त्यागतात तेव्हा काळाच्या पल्याडचं अस्तित्व होतात तेव्हा ते परमसद्गुरु होतात. ओंकारस्वरुप ! यातही काही जण परत परत जगाच्या कल्याणासाठी येतात तर काही कधीच येत नाहीत. त्यांचं महापरिनिर्वाण होतं. दिवा परत लावण्याची शक्यताच मावळते. जसे कृष्ण, बुद्ध, रामकृष्ण परमहंस, संत ज्ञानेश्‍वर, समर्थ, स्वामी विवेकानंद इ. परत परत येत आहेत. ‘मी दोनशे वर्षांनी परत येणार आहे !’ असे रामकृष्ण नरेंद्रनाथांना म्हणाले होते.
    देहात असताना सद्गुरु जीवनमुक्त असतात, जागृत असतात, काळाच्या अभावाचा बोधही असतो. पण देहाला मर्यादा असतात निसर्गाच्या. भुक, तहान, झोप इ. एक जैवीक घड्याळ चालु असतं. पण एकदा देह त्यागानंतर मात्र परमसद्गुरुला या मर्यादा राहत नाही. रामकृष्ण परमहंसांच्या देहत्यागानंतर मां शारदा हातातील कंगण जे सौभाग्याचं लेणं ते काढायला जाते आणि रामकृष्ण सशरीर प्रकट होऊन मी केवळ देह त्यागला आहे, तू कंगण कधी कढु नकोस ! असं तीला सांगतात.
    I am a voice without form असं जेव्हा स्वामी विवेकानंद म्हणतात तेव्हा ‘मी या परमसद्गुरु रुपात आहे’, हे आपणास सांगत आहेत. त्यांनी अनेक जन्म आपल्यासाठी घेतलेले आहेत. मग अशावेळी आपण कुठल्या जन्माची पुण्यतिथी वा जन्मदिन साजरा करायचा ? कृष्ण अर्जुनाला हेच सांगतात बहुनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन। तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप॥5॥ अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्‍वरोऽपि सन्। प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया॥6॥- हे अर्जुना ! माझे व तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत ते तुला नाही पण मला माहित आहे. मी जन्मरहित व अविनाशी असुनही सर्व प्राण्यांचा ईश्‍वर (परमसद्गुरु) असुनही प्रकृतीला स्वाधीन करुन आपल्या योगमायेने प्रकट होत असतो.
    योगी अरविंद स्वत: सांगतात,‘अलिपुरच्या तुरुंगात योगाभ्यास करताना वेळोवेळी स्वामी विवेकानंद मला मार्गदर्शन करायचे.’ ते परमसद्गुरु योग्य व समर्पित उपासकाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. जरी त्यांनी शरीराचा त्याग केलेला असला तरीही.
    तिबेटमध्ये कैलासपर्वतापाशी अशी एक जागा आहे जिथे वैशाखि पौर्णिमेला म्हणजे बुद्ध निर्वाणाच्या दिवशी पाचशे बौद्ध सद्गुरु एकत्र येतात व त्यांना मार्गदर्शनासाठी साक्षात बुद्ध प्रकट होतात. साधनाकाळात स्वामी विवेकानंदांनाही बुद्धांनी दर्शन दिलेले होते.         
    सद्गुरु काळ व अवकाश यात वावरत असतात, त्यांचे अशा प्रकारे परमसद्गुरुशी संवादही चालु असतो. कुठल्यातरी जन्मात ज्याला सद्गुरु मिळाले त्या उपासकाला जरी समाधी लाभली नाही, त्याने देह सोडून परत जन्म घेतला तरी त्याला प्रत्येक जन्मात सूक्ष्म मार्गदर्शन मिळत राहते. त्याला माहिती नसले तरीही. शेवटी एवढंच म्हणवासं वाटतं- म्हणौनि सद्गुरु वर्णवेना। हे गे हेचि माझी वर्णना। अंतरस्थितीचिया खुणा। अंतर्निष्ठ जाणती॥दा.1.4.31॥
जय हरी ! 

लेखन सेवा - दामोदर प्र. रामदासी, पुणे

गुरु, सद्गुरु और परमसद्गुरु का अनसुलझा रहस्य (हिंदी)

गुरु, सद्गुरु और परमसद्गुरु का अनसुलझा रहस्य


I am a Voice Without Form स्वामी विवेकानंद के इस वाक्य में एक गहन सत्यता है। आश्‍वासन है। व्यक्तिगत चेतनाका अंतिम अविष्कार याने ईश्‍वर। एक पत्थरभी ईश्‍वरत्व की राह पर है। भारत की आध्यात्मिक धारणा यही है की ईश्‍वर निर्माण कर्ता से ज्यादा इस अस्तित्व का आखिरी कलश है। मंदिर शिखर है! शायद इसी कराणसे मंदिर के शिखर दर्शन हम करते है ! बीजरुप वह ईश्‍वर कभी ना कभी खिलता है। मोगरे का फुल खिलता है ! इस अपरोक्षानुभूति के बाद उस सिद्ध के अस्तित्व की सुगंध फैलती है। इतरेतर सामान्यजन जो उस खिले हुए अस्तित्व के सान्निध्य में आतेही वह भी सुगंधीत हो जाते है। उस सामान्य जनको भी ईश्‍वर होने के लिए वह मदत करता है। ऐसा वह सद्गुरु तो प्रकट ईश्‍वर है।
    गुरु तीन प्रकार के है- पहला गुरु वह है जो विद्याकी आस जिसे है उसे विद्याका दान देता है। वह है विद्यागुरु या शिक्षक । वह तो केवल ज्ञान देता है पर अस्तित्व नही। वह तो मस्तिष्क में केंद्रीभूत होने को कहता है।
    ‘जो जानने से सब जाना जाता है क्या तुने वह सिखा है ? पिता उद्दालक गुरुकुल से शिक्षा लेकर घर वापस आनेवाले अपने पुत्र श्‍वेतकेतु को यह प्रश्‍न पुछता है। तब उसका उत्तर पाने के लिए फिरसे आश्रम आए अपने विद्यार्थी की जिज्ञासा सुनकर अज्ञान की एकही नाव में बैठे हुए वे विद्यागुरु श्‍वेतकेतु को केवल विधी बताते है। और मै वह नही जानता ऐसा प्रामाणिकतासे कहते भी है। और उसे जानने के लिए श्‍वेतकेतू जंगल में चला जाता है।
    ‘यह विद्या पढकर मै क्या करु? केवल पेट भरना सिखानेवाले इस ज्ञान से भी अधिक किंमती जो है वह मै जानना चाहता हूँ !’ ऐसा अपने बडे भाईसे, मै शाला क्यूँ नहि जाना चाहता इसका कारण बताने वाले गदाधर या रामकृष्ण परमहंस संसारी विद्याकी अपेक्षा अधिक महनीय ऐसा कुछ है यह जानते थे।
    विद्यार्थी ज्ञान की खोज करता है पर शिष्य रुपांतरण की !
    अधिक किंमती, जो जानने से सब जाना जाता है, वह सिखना ज्यादा महत्त्वपूर्ण है। वह सिखाने की जबाबदारी जो लेते है वह सद्गुरु है जो देह धारण किए हुए होते है।
    ‘हां ! मैने उसे देखा है ! जैसे मै तुझे देख रहा हूँ बिल्कुल वैसे ही ! फर्क इतना है की इससे भी ज्यादा सुस्पष्ट रुपसे! क्या तू उसे देखना चाहता है ?’ ऐसा आत्मविश्‍वासपूर्वक कहने वाला साधु नरेंद्रने इससे पूर्व कभी देखा नही था। और यह आत्मविश्‍वास सार्थ करानेवाला स्पर्श उसे उस गुरुने दिया था। जिससे उसका जीवन बदल गया। वह तो स्रोतापन्न हुआ ! निर्विकल्प समाधी के बाद नरेंद्रनाथ ने कहा की ‘उन्होने मुझे दिखलाया ! मैने मेरा ही चेहरा देखा।’ आगे वह भी उस सद्गुरुके स्थान पर कारुण्यभाव से बैठ गया। वह सद्गुरु थे रामकृष्ण परमहंस और वह शिष्य थे नरेंद्रनाथ याने स्वामी विवेकानंद।
    क्या आप हमे कुछ सिखा सकते है ? ऐसा एकने रमण महर्षी को पुछा तो उन्होने कहा, नहि ! मै तो जो सिखाया गया है उसे भुलाने को बताता हूँ। ऐसे सद्गुरु उस बालकवत समर्पित शिष्य को आत्मभान देने के लिए उत्सुक रहते है। उसने जमाया हुआ कुडा कचरा साफ करते है। उसे उसका ही चेहरा दिखाते है।
    ऐसे सद्गुरु अस्तित्व देते है ज्ञान नही। वह विकेंद्रित शिष्य को केंद्र की ओर ले जाते है। वे मस्तिष्क से जानकारी जडमूलसे उखाड फेकतें है। शिष्यके उस पौधे को कही और जगह पुनररोपीत करते है। कदाचित यह काम शुरु में बहुत पीडादायी होता है। वह उखाडना, रोपना, पत्तों का गिरना, मिट्टी में जडों का फिरसे जमना, यह सारा खेल प्रसव वेदनाओं जैसा होता है। फिर वह शिष्य बरगद की पेड जैसा फैलता है, उसका नया जनम होता है, वह द्वीज होता है।
    सॉक्रेटीस कहते थे मै तो दाई जैसा हूँ, और यह बात एकदम सही है, कारण सद्गुरु अहम की मृत्यु के बाद अस्तित्वका होश देनेवाले प्रसव काल में मदत करते है।
    पारस पत्थर लोहे को सोना बनाता है पर सोना लोहे को सोना नहि बनाता, पर सद्गुरु स्पर्श हुआ उपासक मात्र अनेक लोगोंका उद्धारकर्ता बन जाता है।
    पूर्वेषामपि गुरु: कालेनानवच्छेदात् ॥पातंजलयोग, समाधीपाद-26॥ अर्थात कालातीत होने के कारण वह गुरुका गुरु परमसद्गुरु है। सद्गुरु जब देह त्याग करते है तब उनका कालातीत अस्तित्व होता है। तब वे परमसद्गुरु होते है, ओंकारस्वरुप !  इस में भी कुछ कुछ फिरसे जगत के कल्याण के लिए आते है पर कुछ तो कभी नहि आते। उनका महापरिनिर्वाण होता है। दिया सदा के लिए बुझ जाता है। कृष्ण, बुद्ध, रामकृष्ण परमहंस, संत ज्ञानेश्‍वर, समर्थ, स्वामी विवेकानंद आदी फिरसे आते है । ‘मै दोसौ वर्ष बाद फिरसे आनेवाला हूँ !’ ऐसा रामकृष्ण ने नरेंद्रनाथ को कहा था ।
    देह में रहते हुए सद्गुरु जीवनमुक्त होते है, जागृत होते है, समय के अभाव का बोध रहता है। पर देह को मर्यादा होती है प्रकृती की भुक, प्यास, निद्रा आदी एक जैवीक घडी चलती रहती है। पर देह त्याग के बाद परमसद्गुरु अमर्याद रहते है। रामकृष्ण परमहंस के देहत्याग के बाद मां शारदा सौभाग्य अलंकार जो हात का कंगण निकाल रहि थी तब रामकृष्ण सशरीर प्रकट हुए कहने लगे,‘मैने तो केवल देह त्यागदी है। कंगन निकालने की आवश्यकता नहि है।’
    I am a Voice Without Form ऐसा जब स्वामी विवेकानंद कहते है तब ‘मै इस परमसद्गुरु के रुप में हूँ’, यही कह रहे है। वह तो अनेको बार हमारे लिए आए हुए है। ऐसी स्थिती में हम उनका जन्मदिवस या मृत्युतिथी कैसे मना सकते है ? किस जन्म की तिथी मनाएंगे ?
    कृष्ण अर्जुन को यहि बात समझा रहे है- बहुनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन। तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप॥5॥ अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्‍वरोऽपि सन्। प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया॥6॥- हे अर्जुन ! मेरे और तेरे बहुत जन्म हुए है। तुझे नहि पर मुझे वह पता है। मै तो जन्मरहित और अविनाशी होकर भी सब प्राणीयोंका ईश्‍वर (परमसद्गुरु) हूँ। प्रकृती के स्वाधीन होकर अपने आपको अपनी योगमायासे प्रकट करता हूँ।
    योगी अरविंद स्वत: कहते है,‘अलिपुरके कारागृह में योगाभ्यास करते समय स्वामी विवेकानंद मुझे मार्गदर्शन करते थे।’ उन्होने उनके शरीरका त्याग किया हुआ है, फिर भी वे परमसद्गुरु योग्य और समर्पित उपासकको समय समय पर मार्गदर्शन करते रहते है।
    तिबेट में कैलाश पर्वत के पास एक ऐसी जगह है जहा पर हर साल वैशाखि पुर्णिमा पर याने जब बुद्ध निर्वाण को उपलब्ध हुए थे उस विशिष्ट समय पर पाचसौ बौद्ध सद्गुरु एकत्र आते है और उन्हे  मार्गदर्शन करने के लिए साक्षात बुद्ध प्रकट होते है।         साधनाकाल में स्वामी विवेकानंद को भी बुद्ध ने दर्शन दिए थे। सद्गुरु जब समय और अवकाश में विहार करते है तब भी उनका अदृश्य परमसद्गुरु के साथ संवाद चालु ही रहता है।
    किसी जनम में जिसे सद्गुरु मिले है उस उपासक को अगर समाधी लाभ नहि हुआ है और उसने देह छोड दी, फिरसे जन्म लिया तब भी उसे प्रत्येक जन्म में सूक्ष्म मार्गदर्शन मिलता रहता है। उसे पता हो या नहि हो। ऐसे सद्गुरु और परमसद्गुरु कि महत्ता का वर्णन करना मुझे संभव नहि है।
जय हरी ! 

लेखन सेवा - दामोदर प्र. रामदासी, पुणे