Saturday, October 29, 2016

भगवान महावीर निर्वाण दिन (आश्‍विन अमावास्या) (मराठी)

भगवान महावीर निर्वाण दिन (आश्‍विन अमावास्या)
    भारतात निर्माण झालेल्या आध्यात्मिक विचाराला सनातन धर्म वा हिंदू धर्म म्हटले जाते. वैदिक, बौद्ध, जैन, सिख असे अनेक पंथ उपपंथीयांनी या आध्यात्मिक विचाराला समृद्ध केले. दु:खातून मुक्ति वा निर्वाणासाठी अनेक विधी दिले. यात विशेष क्रांतीकारक चेतना अवतरीत झाल्या ज्यांनी या अध्यात्मगंगेला लोकहृदयात त्या त्या काळातील भाषेत प्रतिष्ठीत केले. अशांपैकी एक महान चेतना म्हणजे भगवान महावीर !
    कोण्या एका काळात एका पित्याचे दोन पुत्र, त्यातला एक राष्ट्ररक्षणासाठी हत्यार चालवणारा क्षत्रिय होत असे व दुसरा वेदमंत्र जाणणारा ब्राह्मण. तसेच दु:खमुक्त करणारे विधी व पंथ (मार्ग) वेगवेगळे होते पण व्यक्तिला त्याचे अंतीम सत्य दाखवणारा, सनातनत्वाचे भान देणारा, पुनर्जन्म-पूर्वजन्म सिद्धांत मानणारा, उपासनेत ओंकाराची अनुभूति येणारा, कर्म सिद्धांत स्वीकारणारा म्हणून एकच सनातन धर्म होता. सनपूर्व 15 व्या शतकात कुरुपांचालांच्या भूमीत ब्राह्मण, क्षत्रिय भेद पडला.
    भगवान श्रीकृष्णांचे (जे जैनांच्या पुढच्या कल्पात पहिले तीर्थंकर असतील) चुलतभाऊ घोर अंगिरस (यदुकुळातील श्रेष्ठ पुरुष दशार्ह-अग्रज समुद्रविजय यांची राणी शिवादेवी यांच्या पोटी श्रावण शुक्ल पंचमीला जन्म) ज्यांनी मुक्तिसाठी अहिंसावादी जैन पंथ स्वीकारला व केवलज्ञान प्राप्त करुन भगवान नेमीनाथ या नावाने 22 वे तीर्थंकर म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांच्या निमित्ताने यादवकुळात ब्राह्मण व श्रमण परंपरेचा मेळ साधला गेला असं म्हटलं तर वावगं ठरु नये. त्यांच्या नंतर जैन परंपरेत पुढे सनपूर्व 599-527 दरम्यान 24 वे तीर्थंकर म्हणून भगवान वर्धमान महावीर झाले. ज्यांची अश्‍विन आमावस्या ही तिथी (दिवाळीचा लक्ष्मीपुजनाचा दिवस) निर्वाण दिन म्हणुन ओळखली जाते.
    बिहार राज्यातील वैशालीच्या जवळील कुंडग्रामी (वसाढ) क्षत्रिय कुळातील पिता सिद्धार्थ व माता त्रिशला यांच्या पोटी चैत्र शुद्ध त्रयोदशीला जन्म झाला. वैशाली हे मोठे गणराज्य होते. मगध, कोसल, वत्स व अवंती या विशाल गणराज्याच्या बरोबरीने त्याचा उल्लेख होतो. आईवडिलांनी वर्धमान नाव ठेवले तरी वीरवृत्तीमुळे ते महावीर म्हणून प्रसिद्ध पावले. इंद्र त्यांच्या दर्शनाला आला होता त्याने त्यांचे दर्शन घेताच त्यांना वीर असे संबोधले. तर चारणमुनींनी सन्मती असे संबोधले. संगमदेवाने त्यांना महावीर असे नाव ठेवले.  ज्ञातृपुत्र असेही एक नाव त्यांना आहे.
    वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. ऋजुकूला नदीच्या किनारी जृंभक गावी बारा वर्षे कठोर तप करुन केवल ज्ञान त्यांना मिळाले. नंतर 66 दिवस मगध देशातल्या राजगृहाजवळ विपुलाचल पर्वतावर मौन धरुन त्यांनी विहार केला. तिथेच इंद्रभूती या ब्राह्मणाच्या शंका दूर करुन त्याला पहिला गणधर बनवले. याशिवाय त्यांचे अनेक मुख्य गणधर ब्राह्मणच होते. त्यांचा ब्राह्मणधर्माला जातीप्रथा व अनावश्यक क्रियाकांड सोडता विरोध नव्हता.
    भगवान बुद्धांच्या समकालीन असणार्‍या भगवान महावीरांनी मद्य, मांस, मदिरा, हिंसा, असत्यवचन, मध, चोरी करणं यांना टाळून पत्नीशिवाय इतर स्त्रियांना माता मानणं व आवश्यक तेवढ्या धनाचा संग्रह सांगितला.
    व्यक्तिचे श्रेष्ठत्व त्याच्या कर्मावर ठरते, जन्मावर नाही असा स्पष्टपणा त्यांच्या उपदेशात होता. क्षत्रिय कुळातला जन्म असुनही ‘मी एक श्रेष्ठ ब्राह्मण आहे’ असे ते म्हणत. अध:पतित पुरोहित व त्यांचे अनावश्यक जटिल क्रियाकांड यांना विरोध करत स्त्री, पुरुष व सर्व वर्ण यांना निर्वाणाचा समान अधिकार आहे असे ते म्हणाले.
    य: शस्त्रवृत्ति: समरे रिपु: स्याद् य: कण्टको वा निजमण्डलस्य । अस्त्राणि तत्रैव नृपा: क्षिपन्ति न दीनकानीनशुभाशयेषु॥ अर्थात जो शस्त्रधारण करुन रणांगणात युद्ध करण्यासाठी आला असेल अथवा जो आपल्या देशाला बाधक ठरत असेल अशावरच राजांनी शस्त्र उचलावे. दीन, दु:खी व सद्विचारी पुरुषांवर त्याने शस्त्र उचलु नये. याचाच अर्थ योग्य ठिकाणी वापरलेली हिंसा ही योग्यच आहे हे स्पष्ट केले.
    अर्धमागधी भाषेतील भगवतीसूत्र या ग्रंथाच्या माध्यमातून गुरुशिष्य संवादाने साधकांच्या अनेक शंका ते सोडवतात. साधनेद्वारा संकुचितता सोडून सर्वसंग्राहक पातळी कशी येते याचे प्रत्यंतर त्यांच्या अनेकांतवाद वा स्यादवाद विचारात दिसते. कुठल्याही गोष्टीचा सर्व बाजुंनी विचार करण्याचा संकेत येथे अभिप्रेत आहे. वेगळा विचार करणार्‍या प्रतिपक्षाबद्दल समंजसपणा दाखवण्याचे मानसिक धैर्य अभिप्रेत आहे. स्याद्वादाने येणारे सम्यगज्ञान व अहिंसेने येणारे सम्यगदर्शन या दोघांचा परिपाक सम्यक चारित्र्यात झाला पाहिजे, जो तो आपापल्या कर्म फळांना जबाबदार आहे म्हणून मोक्षासाठी क्रियाक्षय करावा व ज्याचा त्याने स्वत:चा उद्धार स्वत: करुन घ्यावा, कोणी परमेश्‍वर तो देणार नाही असे त्यांनी सांगितले.
    मोक्षाचे अधिकारी कोण ? अहिंसा, कर्म इ. उपदेश बघता भगवान श्रीकृष्णांच्या गीतेतील क्रांतिकारी विचारांची आठवण येते.  केवलज्ञानानंतर 42 वर्षे त्यांनी श्रमणपंथाची संघटना व प्रसाराचे कार्य केले व 72 व्या वर्षी आश्‍विन आमावस्येला मोक्षाला गेले.
    सो जयइ जस्स केवलणाणुज्जलदप्पणम्मि लोयालोयं । पुढ पदिबिंब दीसइ वियसिय सयवत्तगब्भगउरो वीरो ॥- ज्याच्या केवलज्ञानरुपी उज्ज्वल दर्पणात लोक आणि अलोक प्रतिबींबासारखे विशद रुपाने दिसतात आणि जो विकसित कमलाच्या परागाप्रमाणे सुवर्णकांतीने झळकतो, अशा भगवान महावीराचा जयजयकार असो !
लेखन व संशोधन- दामोदर प्र. रामदासी

भगवान महावीर निर्वाण दिन (आश्‍विन अमावास्या) (हिंदी)

भगवान महावीर निर्वाण दिन (आश्‍विन अमावास्या)
    भारत में निर्माण हुए आध्यात्मिक विचार को सनातन धर्म या हिंदू धर्म कहते है। वैदिक, बौद्ध, जैन, सिख ऐसे अनेक पंथ उपपंथो ने इस आध्यात्मिक विचार को समृद्ध किया। दु:ख से मुक्ति या निर्वाण के लिए अनेक विधीयाँ दि। इस कार्य के लिए विशेष क्रांतीकारक चेतना अवतरीत हुई, जिन्होने इस अध्यात्मगंगा को लोकहृदय में उस काल की भाषा में प्रतिष्ठीत किया । ऐसी चेतनाओं में एक महान चेतना हुई भगवान महावीर !
    किसी समय में एकही पिता के दो पुत्रो में से एक राष्ट्ररक्षण के लिए शस्त्र उठानेवाला क्षत्रिय होता था तो दुसरा वेदमंत्र जाननेवाला ब्राह्मण । दु:खमुक्त करनेवाली विधी एवं पंथ (मार्ग) अलगअलग होते थे पर व्यक्तिको उसका अंतीम सत्य दिखलानेवाला, सनातनत्वका स्मरण करा देनेवाला, पुनर्जन्म-पूर्वजन्म सिद्धांतको माननेवाला, उपासना में ओंकारकी अनुभूति देनेवाला, कर्म सिद्धांत स्वीकार करनेवाला एकही सनातन धर्म था। सनपूर्व 15 वी सदी में कुरुपांचाल की भूमी में ब्राह्मण, क्षत्रिय ऐसा भेद शुरु हुआ था।
    भगवान श्रीकृष्ण के (जो जैनों के अगले कल्प में पहले तीर्थंकर होंगे) चचेरेभाई घोर अंगिरस (यदुकुल के श्रेष्ठ पुरुष दशार्ह-अग्रज समुद्रविजय इनकी रानी शिवादेवी इनके गर्भसे श्रावण शुक्ल पंचमीको जन्म) जिन्होने मुक्ति के लिए अहिंसावादी जैन पंथ का स्वीकार किया और केवलज्ञान प्राप्त करके भगवान नेमीनाथ इस नाम से 22 वे तीर्थंकर होकर प्रसिद्ध हुए। इसी बहाने यदुकुल में ब्राह्मण और श्रमण परंपराका मिलन हुआ ऐसा कहना अनुचित नही होगा । उनके बाद जैन परंपरा में सनपूर्व 599-527 के बीच में 24 वे तीर्थंकर भगवान वर्धमान महावीर हुए। जिनकी अश्‍विन अमावस्या यह तिथी (दिवालीका लक्ष्मीपुजनका दिन) महानिर्वाण दिन से पहचाना जाता है।
    बिहार राज्य में वैशालीके पास कुंडग्राम में (वसाढ) क्षत्रिय कुल में पिता सिद्धार्थ और माता त्रिशला इनके गर्भसे चैत्र शुद्ध त्रयोदशी को इनका जन्म हुआ। वैशाली महत्त्वपूर्ण गणराज्य था। मगध, कोसल, वत्स और अवंती इन विशाल गणराज्यों के समान वह बडा था। माँबाप ने वर्धमान नाम रख दिया तो वीरवृत्ती के कारण वे महावीर कहलाए। एक बार इंद्र उनके दर्शन के लिए आया था तब दर्शन लेते ही उन्हे वीर ऐसा कहा। तो चारणमुनीने सन्मती ऐसा कहा। संगमदेवने महावीर ऐसा नाम रखा। ज्ञातृपुत्र ऐसा और एक नाम भी उनका है।
    आयु के 30 साल में उन्होने गृहत्याग किया। ऋजुकूला नदी के तट पर जृंभक गाव में बारा साल कठोर तप करके उन्हे केवल ज्ञान हुआ। बाद में 66 दिन मगध देश में राजगृह के पास विपुलाचल पर्वतपर मौन धारण कर उन्होने विहार किया। वही इंद्रभूती नाम के ब्राह्मण की शंकाओंको दूर कर उसे पहला गणधर बनाया। इसके अलावा उनके अनेक मुख्य गणधर ब्राह्मणही थे । उनका ब्राह्मणधर्मकी जातीप्रथा एवं अनावश्यक क्रियाकांड छोडकर विरोध नही था ।
    भगवान बुद्ध के समकालीन भगवान महावीर ने मद्य, मांस, मदिरा, हिंसा, असत्यवचन, शहद, चोरी करना इन बातों को त्यागकर पत्नी के सिवाय परस्त्री को माता मानना और आवश्यक धन संग्रह बताया।
    व्यक्ती श्रेष्ठ होता है उसके कर्मसे जन्म से नही ऐसी स्पष्ट बात उन्होने कही। क्षत्रिय परिवार में जन्म लेकर भी ‘मै एक श्रेष्ठ ब्राह्मण हूँ’ ऐसा वे कहते थे। अध:पतित पुरोहित और उनके अनावश्यक जटिल क्रियाकांड इनको उन्होने विरोध किया । स्त्री, पुरुष और सभी वर्णों को मुक्ती का समान अधिकार है ऐसे वे कहते थे।
    य: शस्त्रवृत्ति: समरे रिपु: स्याद् य: कण्टको वा निजमण्डलस्य । अस्त्राणि तत्रैव नृपा: क्षिपन्ति न दीनकानीनशुभाशयेषु॥ अर्थात जो शस्त्रधारण कर के युद्धभूमी में युद्ध करने के लिए आया है या जो अपनी मातृभूमी को बाधा देने वाला हो ऐसे व्यक्तीपरही राजाओं को शस्त्र उठाना चाहिए। दीन, दु:खी और सद्विचारी पुरुषों पर नही। इसका अर्थ यह हुआ की उचित समय पर हिंसा का समर्थन उन्होने किया।
    अर्धमागधी भाषा के भगवतीसूत्र इस ग्रंथ में गुरुशिष्य संवाद से साधककों की अनेक शंकाओं का वे उत्तर देते है। साधनाद्वारा संकीर्णता छोडकर सर्वसंग्राहक स्तर को प्राप्त करने का अनुभव उनके अनेकांतवाद या स्यादवाद विचारो में दिखायी देता है। किसी भी चिजका चारो दिशाओं से विचार करनेका इशारा यहा मिलता है। अलग विचारोंके विरोधी पक्ष के बारे में समझदारी दिखानेका मानसिक धैर्य यहाँ अभिप्रेत आहे। स्याद्वाद से प्राप्त होनेवाला सम्यगज्ञान और अहिंसासे मिलनेवाला सम्यगदर्शन इन दोनोंका सार सम्यक चारित्र्य में प्रतिध्वनित होना चाहिए। हर किसीपर अपने अपने कर्म फलोंकी जवाबदेही होती है, इस कारण मोक्ष के लिए क्रियाक्षय करे और हर किसी को अपना उद्धार स्वयं को ही करना होगा, कोई परमेश्‍वर मोक्ष देनेवाला नही है ऐसा उन्होने कहा।
    मोक्ष का अधिकारी कौन ? अहिंसा, कर्म आदी उपदेशों को देखते हुए भगवान श्रीकृष्ण के गीता में दिए हुए क्रांतिकारी विचारोंकी याद आ जाती है । केवलज्ञान के बाद 42 वर्ष उन्होने श्रमणपंथ संघ निर्माण और प्रसार का कार्य किया और 72 साल की आयु में उनका अश्‍विन अमावस्या को निर्वाण हुआ।
    सो जयइ जस्स केवलणाणुज्जलदप्पणम्मि लोयालोयं । पुढ पदिबिंब दीसइ वियसिय सयवत्तगब्भगउरो वीरो ॥- जिसके केवलज्ञानरुपी उज्ज्वल दर्पण में लोक और अलोक प्रतिबींबीत समान विशद रुपसे दिखायी देते है और जो विकसित कमल पुष्प परागों के समान सुवर्णकांती से तेजोमय है, ऐसे भगवान महावीर का जयजयकार हो !
लेखन एवं संशोधन- दामोदर प्र. रामदासी