कृष्णजन्माष्टमी च्या निमित्ताने लेखन भावपुष्प
विष्णुमय जग ! वैष्णवांचा धर्म !!
भाग 1
भगवान विष्णु कृपेचा सोहळा कुठेही करु शकतात; असा उल्लेख ऋग्वेदांत आहे. यत्रा सुपर्णा अमृतस्य भागमनिमेषं विदथाभिस्वरन्ति। इनो विश्वस्य भुवनस्य गोपा: स मा धीर: पाकमत्रा विवेश॥ (ऋग्वेद 1.164.21) अर्थात अमृताचा कुंभ ज्याच्या स्वाधीन आहे ते परमात्म तत्त्व- महान आत्मा- जगत्स्वामी सर्वज्ञ ईश्वर माझ्यासारख्या अपक्व दशेतील जिज्ञासु साधकजीवनात प्रवेश करता झाला; अर्थात किरणांत सूर्यप्रकाश जसा सर्वत्वाने प्रवेशतो तसा हा परमात्मा साधकजीवनात स्वप्रकाशाने अवतरतो. तथापी ही कृपा साधकांच्या अपक्वकाळी आहे हे लक्षात ठेवावे. भगवंताचे हे रुप प्रभातकाळच्या सूर्यासारखे आहे. जिथे जिवात्मा प्रथम जागृत होतो. विष्णुमय जगताचा भावोत्सव, समर्पणाचा गंगा तट तर अजुन पुढेच आहे. जिथे हा अमृतकुंभ पालथा होईल.

पै आपुलेनि भेदेविण। माझे जाणिजे जे एकपण। तयाचि नांव शरण। मज येणें गा॥ ज्ञा. 18.1398॥
शरण्य प्रपत्तिदशा (चित्ताची शरणमार्गीय दशा) उपासकास सुरुवातीस प्राप्त होते, भगवंताशी शरण्य एकता होते. स्व-तंत्रता कृष्ण तंत्रता होऊन जाते. आईने लेकराला कडेवर घ्यावे तसे सहजसाधनेचा कृपापंथ म्हणजे भक्तियोग भगवंत घडवून आणतात. अशावेळी कडेवर बसलेले लेकरु आईकडे मौजेने बघायला लागते. आईविषयीच्या अनेकानेक भावनांनी त्याचं चित्त भरुन जातं.
विराटाचे संकर्षण म्हणजे सगुण श्रीकृष्ण तर सगुणाचे अनंत विस्तरण म्हणजे विराट. इथे भक्तप्रेमापोटी विराटाने संकर्षण केलेले आहे. तो पार्थसारथी भक्ताला अभ्युदय व नि:श्रेयसाच्या धर्ममार्गावरुन नेत आहे. सगुण प्रत्ययाची लीला दाखवताना त्या परमसद्गुरुच्या अमृतशब्दांवरील ध्यान उपासकाला प्रपंच व परमार्थ दोन्हीमध्ये सिद्धी दिल्याशिवाय राहत नाही.
उपासकाच्या परिशुद्ध व प्रांजळप्रज्ञेला भगवंताची अनेक रुपे दिसतात. श्रीकृष्ण चेतना अध्यात्मातील परम गहनता व अभिव्यक्तिची अलौकीक उंची गाठतानाही गंभीर रसापेक्षा आनंदरुपी अमृतसागराचे रुप धारण करते जिच्या उकळ्या उपासकाला आचिंब भिजवून टाकतात
मानवजातीच्या इतिहासात इतक्या समग्रतेने व चहुअंगाने जीवनाला सहजतेने स्वीकारणार्या श्रीकृष्णासारखी चेतना दुसरी झाली नाही. सृष्टीने दिलेल्या सर्व सुकोमल वा टोकदार अशा विविध भावनांचा सन्मान त्याने वाढवला. दु:खी चित्ताच्या काटेरी आयुष्याला उमलण्याचे स्वप्न दिले. उदासीनता वा दमनाचा निषेध करत - त्या सर्व भावनांतून मीच वाहत नाही का ? मग आता तुझ्यासमोर वा तुझ्यातुन जे प्रकट होईल त्याचा उत्सव साजरा करण्यापलिकडे तुझ्या हातात काय आहे ? या प्रश्नाने त्या उपासकाला जीवनाचे पसायदान दिले.
त्याने अकारण आनंदी व्हा चा मंत्र दिला. फुल कुठल्या ध्येयाने उमलते ? वार्याचे ध्येय काय ? उत्तर आहे अकारण !
शरीराची स्पंदने, वाहणार्या अनंत भावना यांचा सहजस्वीकार स्वीकारायला तो भाग पाडतो. त्यांच्याशी लढण्यापेक्षा, दमनापेक्षा रुपांतराचा मार्ग दाखवतो. कारण त्या शक्ति आपल्याच आहेत. त्यांच्याशी लढणे म्हणजे एका हाताने दुसर्या हाताशी लढल्यासारखं आहे.
विषयेभ्य: परावर्त्य स्थापनं स्वस्वगोलके। उभयेषामिन्द्रियाणाम् स दम: परिकीर्तित:॥विवेकचुडामणि-23॥ कर्म व ज्ञान इंद्रियांचा प्रत्याहार अर्थात त्यांना अंतर्मुख करणे म्हणजे दमन असे आदि शंकराचार्य सांगतात. काहिंना वाटणारे दमन (भावनांना दाबुन टाकणे असे समजणे) भक्तिविरोधी आहे. सृष्टी प्रदत्त भावना विष्णुमय आहेत किंबहुना विष्णुंचीच कृपा आहे. तद्विष्णो: परमं पदम् सदा पश्यन्ति सूरय:। दिवीव चक्षुराततम्॥ (ऋग्वेद 1.22.20) या व्यापक भगवंताचा साधकास पूर्ण सहयोग असतो. याचेच उदात्त प्रकाशमान रुप साधकजन अंतराकाशात न्याहाळतात, त्या कृपेने तो साधक प्रकाशतो.
आंतरजगत विष्णुमय झाल्यावर त्या उपासकाचे स्वधर्मचक्रप्रवर्तन विविध स्तरांवर आत सुरु होते. सर्व भेद मावळतात. जन्मोजन्मीची अमंगलता मावळते. उपासकाला परिपूर्ण करण्यास विष्णुतत्त्व मदत करते. म्हणूनच त्या सर्व भावभावना शरीरमनांतून एकरस असतात. त्यांचं कृष्णमय होणं ही घटना क्रांती घडवून आणते. त्या कृष्णाला आत्महिंसा वा तथाकथित दमन मान्य नाही.
तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् । मयैवैते निहता: पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्॥गीता11-33॥ हे सव्यसाची (डाव्या हातानेही बाण सोडु शकणारा) म्हणून तू ऊठ. यश मिळव. शत्रूंना जिंकून धनधान्यसंपन्न राज्याचा उपभोग घे. हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेले आहेत. तू फक्त निमित्तमात्र हो !
कृष्ण रसाने रसमय झालेला असा उपासक हे ऐकून पलायन करत नाही. भक्तिचं सामर्थ्य लाभलेला तो- पुरुष असला तर स्त्री पासुन पलायन करत नाही, अहिंसा व शांतीस्वरुपाच्या धर्मक्षेत्रावरुन थेट कुरुक्षेत्रावरील युद्धात, हिंसेच्या दावनलात उतरायची छाती ठेवतो. बाहेर अनंत संघर्ष आहे पण आत मात्र त्याची अनंत शांती ढळत नाही.
आयुष्याचा समग्र स्वीकार झालेली चेतना उपासकात जन्माला घालणं हेच तर त्याच्या लीलेचं ध्येय, मग अमृत हाती आल्यावर त्या उपासकाला विषाची काय भिती ? अहिंसा सिद्ध झाल्यावर हिंसेचे काय भय ? जर ती अहिंसा हिंसेला घाबरत असेल, तर तीला नपुंसकच म्हणायला हवी. समस्त द्वंद्वांचा एक साथ स्वीकार हीच कृष्ण भक्ति ! हेच समर्पण !
श्रीकृष्णार्पणमस्तु !
लेखनसेवा - दामोदर प्र. रामदासी

No comments:
Post a Comment