संत ज्ञानेश्वरांनी चामुंडा देवीला अर्पण केलेला बळी !
काय आपण संतांनी अनुप्राणित केलेल्या मार्गाने जाणारे वारकरी आहोत ? काय आपण भागवतधर्मरुपी विठ्ठलाला समर्पित आहोत ? काय हरीप्रेमानं आपलं हृदय उन्मळुन येतं ? काय आपण भक्तिप्रेमरुपी सद्गुरुंनी दाखवलेल्या मार्गाने जाणारे आहोत ? कुलस्वामीनीच्या उपासनेमध्ये काय खरोखरंच आपले नवरात्र धन्य झाले असे वाटते आहे ? याचे उत्तर हो असेल तर दसर्याला देवाच्या नावाने अर्पण केला जाणार्या बळी प्रथेला आपण विरोध करु. ज्ञानेश्वर माऊलींनी बळीचा खरा अर्थ समजाऊन सांगितला आहे.
प्राणशक्तिचामुंडे । प्रहारूनि संकल्पमेंढे । मनोमहिषाचेनि मुंडे । दिधली बळी ॥ ज्ञानेश्वरी-12-53॥
महावैष्णव ज्ञानेश्वर माऊलींच्या उपासना यात्रेत कुठल्या रेड्याचा व मेंढ्याचा बळी दिला जातो ? हे पहिल्याच माळेला आपल्याला कळले तर नवरात्रीच्या जागरणाला वा उपासनेला ते पूरक ठरु शकेल.
संकल्प विकल्प हा मेंढा व मनरुपी रेडा यांना प्राणशक्ति चामुंडा देवीस बळी दिला आहे, असे संत ज्ञानेश्वर सांगतात. ज्ञानदेवांचे असे नवरात्र समापन विलक्षण आहे. हे खुप आंतरिक रहस्य आहे की ज्यात मन-चित्ताची बळी देण्याची ही यौगीक पद्धती सद्गुरुकृपेशिवाय असंभव आहे म्हणुनच एका मर्यादेपर्यंतच शब्दांचा वापर करण्याचे हे धाडस आहे.
उपासनेत जे सहजच होणार आहे त्या विलक्षण घटनेत सुरुवातीपासुनच मनाला वा चित्ताला जुलुम जबरदस्तीने दाबण्याचे कारण नाही, या वाटचालीत सुक्ष्मामध्ये उतरत असताना उपासनेचा संवेदनशिल नाजुक भाग चालु होतो. मनाचा वा चित्ताचा क्रियासंभव हा केवळ कुंडलिनी प्राणशक्तीच्या तेजाचाच असतो. अपेक्षित मन मौनी व चित्त चैतन्य हे सद्गुरुकृपेने स्वभावेच घडुन येते.
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा। मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य॥1॥ मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला। गोरक्ष बोलला गहीनीप्रती। गहीनीप्रसादे निवृत्ती दातार। ज्ञानदेवा सार चोजविले॥3॥ आपल्या गुरुपरंपरेचा उल्लेख करताना कैवल्यरुप माऊलींवर नाथपंथीय हठयोगाचा प्रभाव आहे हे स्पष्टच होते.
हठयोग शक्तिवादी आहे. यात शक्ति व ज्ञान निष्ठेने उपासकाचे जीवन समर्पित असते. ज्ञान म्हणजे शिव व कुंडलिनी म्हणजे शक्ति. ही शिवशक्तिसामरस्यान्वित उपासना हठयोग मार्गाने जाते. दुसरा कुठलाही संप्रदाय ज्यास चामुंडा संबोधित नाही त्या कुंडलिनीला, प्राणशक्तिला चामुंडे संबोधुन त्या अतिप्राचीन नाथपरंपरेचा माऊली गौरवाने उल्लेख करतात.
चामुंडा ही अज्ञ लोकांची देवी आहे. विकाराच्या वार्याने अतिशय फडफडल्यामुळे विगलितगात्र अवस्था प्राप्त झालेल्या, बंधनात अडकलेले असल्यामुळे आधिभौतिक, आधिदैविक व अध्यात्मिक दु:खाचा अनुभव घेणार्या कोणाही जीवाला अज्ञ म्हटले जाते. अशा अज्ञांची समस्त बंधने तोडुन त्यांची शिवत्वाशी गाठ भेट घडवून आणणारी ही चामुंडा महदंबा आहे.
चामुंडा म्हणजे तपस्विनी कुमारिका. जिची उपासना करुन उपासकाला शिवत्वाचे भान येते. नवरात्रात हा समर्पणाचा चितशक्तिविलास आपोआप चालु राहतो. जो प्रारंभी प्रकृतीवशात आपण अनाथ आहोत असे बरळत असतो तोच चामुंडेच्या कृपेने व शिवत्वाच्या भानाने आपोआप नाथ होतो व इतरांना सनाथ करण्याचे सामर्थ्य मिळवतो.
नाथपंथी बाहेर शिव, आत शाक्त व समाजात वैष्णव असावा असा संदेशच आहे. त्यामुळे वैष्णवता हे त्याचे हृदय, शिवता हे मस्तक तर शक्तियुक्त असणे हे मन होते. साहजिकच तो शक्तिमय, योगनिष्ठ, जनहितकारी, आचारवान असतोच. म्हणुनच तो नाथ या संज्ञेला पात्र ठरतो.
प्रारंभी मन-चित्ताच्या क्रिया जेव्हा मलिन असतात तेव्हा नाथत्व अप्रकट असते. जीवाची हीच अनाथ अवस्था असते. तिथे पशुवत चेतना प्रभावी ठरते. उपासनेच्या सहज यात्रेत ती संवेदनशील वळणावर कुंडलिनीत लीन होते. ही सहज लीनता महत्त्वाची घटना ठरते.
मनोदोष म्हणजे संकल्प विकल्प होत, चित्तदोष म्हणजे असत यावर श्रद्धाशील असणे होय. ही प्राणशक्ति जागृत होताच हे दोष नाहिसे होतात. अर्थात या दोषांचे अर्पण करणे ज्ञानेशांना अपेक्षित असल्याने माऊलींच्या नवरात्रात देवीचा थाट असामान्य आहे. इथे ते वीरयोगी लक्षणा प्रकट करतात. हा वीरयोगी चामुंडेला असा बळी अर्पण करुन शिव होतो.
त्याचा नवरात्र जागर सिद्ध होतो, तो अज्ञतेचे सिमोल्लंघन करुन अनंत चैतन्याच्या प्रांगणात विजयोत्सव साजरा करतो. त्या पुढेही - उपासनेच्या उत्कट पोर्णिमेला कोजागरती ? विचारत येणारी शक्ती अशा जागलेल्या नाथाला पाहुन प्रसन्न होते. ज्ञानरुपी चंद्राच्या शितल प्रकाशात अमृतस्य पुत्र: ! या भावमयतेचे दुग्धामृत प्राशन करुन तो संजीवन झालेला असतो. ज्ञानेशांची परंपराही या नाथ - वैष्णवाच्या अशा प्रवेशाने धन्य होते ! अशा तापहीन मार्तंडांचे धुंद वारी नृत्य, हे आनंदगान अस्तित्वात चालूच राहते.
भवतारिणी चामुंडेच्या चरणी प्रतिक्षणाला समर्पित भावमयतेचा हा अखंड जागर आपण सुरु करुयात व अज्ञानाचा रेडा तिच्या चरणी बळी देऊयात. जय चामुंडा भवानी !
लेखनसेवा- दामोदर प्र. रामदासी !

No comments:
Post a Comment