संसार सुफळ जाला गे माये !
ज्ञानाची यात्रा द्वैतापर्यंतच, भक्तिची यात्रा पुढे सुरुच राहते ! दिंडी चालतच राहते ! मनाला द्वैत कळते. लाट व सागर वेगवेगळे वाटतात. पण उठलेली लाट सागरच नाही का ? भक्तिसूत्र आहे- युक्तौ च सम्परायात् । वियोगाच्या आधी दोन्ही एकच आहेत. जसं जन्माच्या आधी आई व बाळ एकच असतात, तसा भेदही वरवरचा आहे. जेव्हा आपण नव्हतो तेव्हा आपण कुठे होतो हा विचार किती गंमतीचा आहे.
अनेक जन्मांचा आपला स्वत:चा शोध कुठल्यातरी जन्मात मी कोण ? या परमप्रश्नाचे गहन विश्लेषण करायला भाग पाडतो. आणि संभावना शक्य वाटायला लागतात. वारकर्याची वारी अनेक जन्मांपासून चालूच आहे. आतल्या विठ्ठलाचे स्मरण येईपर्यंत. त्या अज्ञाताचे आश्वासित अनंत हात सांभाळताना भानही देतात की मी माझ्या गर्भात मलाच बाळगुन होतो. किंबहुना तो गर्भ त्याच अनंताचा आहे. मी रोज होत जाणारा परमात्मा आहे ! वारीत नाचता नाचता, भजन गाताना, एकांतात मौनामध्ये कुठल्यातरी क्षणाला आलेलं हे भान किंमतीचं होतं, मग संसाराला दु:खमय म्हणून करत असलेली व्याख्या बदलून जाते. एकदम पिंजर्यातून मोकळं सुटल्यावर पक्ष्याला व्हावं तसं वाटायला लागतं.
संसारव्यथे फिटला। जो नैराश्ये विनटला। व्याधा हातोनि सुटला। विहंगु जैसा॥ (ज्ञा.12-181) हा भक्त कसा असतो ! पारध्याच्या हातून सुटलेला पक्षी स्वैरपणे विहरतो, तसा हा भक्त संसारातील नाना क्लेश, नैराश्य, व्याधींपासून मुक्त होतो व इच्छारहित होऊन या संसारात विहरु लागतो. म्हणून अंतरयात्रेची वारी हा योग्याचा आनंदमय प्रवासच असतो !
इथे संसारव्यथा म्हणजे संसार हीच व्यथा असे नसून संसारात असलेली व्यथा अशी व्याख्या करावी लागते. तेव्हा सुखाचा विस्तार म्हणजे संसार असा प्रत्यय येतो. कारण तो त्या शक्तीचीच अभिव्यक्ति नव्हे का ? शक्तित्वान्नानृत वेद्यम्- शक्ति ही क्रिया आहे, यामुळे हे जग मिथ्या नाही. (भक्तिसूत्र) केवळ चिद्विलास !
संसार म्हणून जी व्याख्या मन करते ती केवळ वस्तुनिर्देशाने आहे. अपरिच्छिन्न असा परमात्मा, त्याच्या लीलारुप जगताशी भ्रांतिकाळांत आलेला जीवाचा संबंध म्हणजे संसार. भ्रांती मिटताच जन्ममरणाचे स्वइच्छेने केलेले आवागमनही स्वसुखच असते. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी ! हे उद्गार तेव्हा निघतात.
सुख हे माझ्या बाहेर आहे असं वाटणं म्हणजे काम ! असा देहबुद्धी असलेला जीव मी कर्ताच्या भावनेने जखडलेला, स्वकेंद्राबाहेर सुखाला शोधत फिरतो, त्याच्यासाठी संसार सुखदु:खमय ठरतो. जन्म विषयांची आवडी। जन्म दुराशेची बेडी। जन्म काळाची कांकडी। भक्षिताहे॥दासबोध, द.3, स.1, 9॥ असे नकारात्मक उद्गार निघु लागतात.
ही भ्रांतीरुप स्थिती म्हणजे व्यथा ! पण चिदानंदी मग्न पुरुषाला आजी संसार सुफळ झाला गे माये ! असं वाटु लागते. कारण देखिएले पाय विठोबाचे ! विठोबाचे पाय बघणं म्हणजे स्वत:चं दर्शन होणं. पाहावे आपणासि आपण या नाव ज्ञान ! असं समर्थ म्हणतात. त्याची माया सुटते. चिद्रुप विस्ताराचे स्वरुप भ्रांतीच्या विलक्षण माध्यमातून प्रकट होते तेव्हा तीला माया म्हणावे ! माया अर्थात मेय म्हणजे ज्याला मोजता येते अशी गोष्ट. पण जे फुटपट्टीत सापडत नाही त्याचं भान संतत्व देऊन जाते.
जो भगवंताचा भक्त। तो जन्मापासून मुक्त। ज्ञानबळे विरक्त। सर्वकाळ॥(दा. दशक 3, स. 2, 52) हे भान यायला कृपाच हवी. अन्यथा नियती व काळ यांच्या सत्तेखाली जीवाला अनिच्छेने जन्म घ्यावा लागतो. काळ म्हणजेच वासना. काळ वासनेची निर्मिती आहे. वासनामय जीवाला मृत्युची भिती वाटते कारण मृत्युमुळे काळ थांबतो. वासना शिल्लक आहेत पण मृत्यु समोर आहे. ययाती आपल्या पुत्रांनाही त्यांचं आयुष्य मागतो तरी हजार वर्षात वासना संपत नाहीत. वासना पूर्तीसाठी वेळ, भविष्यकाळ पाहिजे. उद्याच्या आशेवर प्रत्येकातला ययाती जगणं चालु ठेवतो. आत्ता आपल्याला राहता येत नाही, पण तसं झालं तर चालू क्षणात इच्छा करणं मुश्किल होतं कारण आत्ता असा कितीसा आपल्या हाताने पकडता येतो ? तो आत्ता म्हणेपर्यंत भूतकाळात जमा होतो.
वासनातीत होणं म्हणजेच कालातीत होणं. काटे नसलेलं घड्याळ होणं. जाणीवेला वासनेचा स्पर्श झाला की काळ निर्माण होतो. अस्तित्वात काळ नसतो. शुद्ध जाणीव म्हणजे अस्तित्वमय होणं. पृथ्वीवरुन माणुस हरवला तर काळ संपून जाईल. संभ्रमित जीवाला जगाचे होणारे अयथार्थ ज्ञान म्हणजेच संसार. बस भ्रांती मिटायला हवी !
असा निभ्रांत, विदेही झालेला पुरुष कितीही संसारी रमलेला दिसला तरी तो नित्यमुक्तच ठरतो. आरशात प्रतिबींबे उमटत राहावीत, परत परत नवीन उमटावीत पण आरशाला काही चिकटत नाही तशी दशा होते. विश्वामाजी अक्षर क्षरले साचार। त्या रुपा आधार पुससी काई॥ आपणचि विश्व आपणचि विश्वेश। जेथे द्वेषाद्वेष मावळले॥ (निवृत्ती 349) मग विश्व हेच विश्वेश, विश्वेश हाच विश्व ! द्वैताच्या व्याख्या संपल्या ! कारण त्या अक्षराचे आलेले स्मरण !
मग संसार म्हणून काही वाटणे, जन्म मरण म्हणून केलेली स्वचेतनेची व्याख्या मावळते. अरे जे जालेचि नाही। त्याची वार्ता पुससी काई। (दास.8-3-1) केवळ श्रीहरीचे प्रेमरुप चिंतन हाच या भ्रांतीरुपाला उतारा. तृष्णा जेव्हा कृष्णा होते, भ्रांती निभ्रांतीत जाते तेव्हा अवघा रंग एक झाला ! मग सारे रंग माझेच ! आता सत्य-मिथ्या म्हणून कशाची व्याख्या करु ? संतांनी पालख्या उचलल्या, ही अनंताची वारी कधीतरी समाप्त होऊ शकते काय ? मग नाचणे व हरिपाठ गाण्याशिवाय पर्याय तो काय ? जय हरी !

No comments:
Post a Comment