संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधि अवस्था
शरीराच्या माध्यमातून करत असलेल्या लीलेला थांबवून आता त्या चौकटीच्या बाहेर पडून माऊलींना उपासकांना धर्मज्ञान प्रदान करायचे कार्य चालु ठेवायचे होते. संजीवन समाधीचा माऊलींचा हा निर्णय पाहिल्यावर ‘आय एम अ व्हाईस विथाऊट फॉर्म’ हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य आठवते. कार्य करायला जेव्हा शरीराच्या मर्यादा जाणवू लागतात तेव्हा माऊलीला संजीवन समाधीचा निर्णय घ्यावा लागला. जो जन्मतही नाही व मृत्युही पावत नाही अशा अनंत चैतन्याला शरीराचे व्यवधान वाटणे स्वाभाविक आहे. त्यांनी दिवस निवडला, तो निर्णय आपले सद्गुरु संत निवृत्तीनाथांना सांगितला. संत नामदेवांसकट अनेक संत गोळा झाले. तिनचार दिवस आधीच नामदेवांच्या पुत्रांनी समाधीस्थान तयार केले. कार्तिकी द्वादशीला शेवटचे कीर्तन माऊलींनी केले, सामान्यजनांचा निरोप घेतला. सामान्यजनांचं हृदय अर्थात भरुन आलं. पण जे युक्ती जाणत होते ते स्थिर होते. कीर्तनानंतर माऊलींनी मौन धारण केले. कार्तिकी वद्य त्रयोदशीला सिद्धबेटाचा परिसर टाळमृदंगानी व विठ्ठल नामाने भारुन गेला. सिद्धेश्वर शिवमंदिराजवळील गुहेत उन्मनी अवस्थेतील ज्ञानदेवांना नामदेव व निवृत्तीनाथांनी आधार देऊन आसनावर नेऊन बसवले. भगवान विठ्ठल साक्षीला होते. माऊलींच्या इच्छेने ज्ञानेश्वरी पुढ्यात ठेवली. दीर्घ ओंकारानंतर सद्गुरुंच्या समोर त्यांना गहन समाधी लागली. त्या गुहेचे द्वार स्वहस्ते निवृत्तीनाथांनी बंद केले. ही संजीवन समाधी म्हणजे नेमके काय हे काही संशोधनाच्या आधारे समजुन घेण्याचा आपण प्रयत्न करु. या विषयावर लिहिण्याचा आपला अधिकार नाही पण या निमित्ताने माऊलींचे स्मरण करण्याची संधी आपण का दवडावी ! म्हणुन हा लेख.
कुंडलिनी उपासनेत तिच्या त्रिविध अवस्था ब्रह्मग्रंथी, विष्णुग्रंथी व रुद्रगंथी यांचे वर्णन आहे ; या ग्रंथी म्हणजे वैदिक कल्पनेप्रमाणे स्वर्ग, मृत्यु व पाताळ या त्रिलोकांची द्वारे होत. येथे स्वर्ग म्हणजेच ‘मोक्ष’ होय. मोक्ष, स्वसंवेद्य, अवधूत, सिद्धत्त्व हे सर्व शब्द अवस्थेने एकाच अर्थाचे आहेत. येथील मोक्ष म्हणजेच ‘चिरंजीवपद’ वा ‘संजीवन समाधि’ अवस्था होय.
ब्रह्मग्रंथि मणिपूरचक्रात मध्यभागी असून हिचा भेद झाल्यावरच ऊर्ध्वगती वा उन्नत स्तरीय दिव्यसृष्टींत प्रवेश मिळू शकतो. विष्णुग्रंथि हृच्चक्रात (हृदयचक्रात) असून रुद्रग्रंथि आज्ञाचक्राच्या व सहस्राधाराच्या बरोबर मध्यभागी असते.
मग कुंडलिनियेचा टेंभा। आधारी केला उभा। तया चोजवले प्रभा। निमथावरी ॥ओवी क्र. 51, अ. 12॥- कुंडलिनी आधारचक्रपासून मणिपूरचक्रापर्यंत पूर्ण जागृत आहे. ती हळूहळू सुषुम्नामार्गे आपल्या प्रगत शक्तिकेंद्रांशी युक्त व्हावयास ऊर्ध्व मार्गाने प्रयाण करणार आहे. अर्थात हा पिंड ब्रह्मांडाची चेतना शक्ति म्हणजे कुंडलीनीचा प्रवास माऊली सांगते. ती शिवाची निजकला अभेदपणे पिंडब्रह्माचा पसारा क्रियाद्युक्त करत असते. ज्ञानेशांच्या नाथपरंपरेचा हाच शिवशक्ती ऐक्य प्रबोध होय. ऋग्वेदांत हिला कुहरिणी, कुवरणी इ. नावे आहेत. देहात ब्रह्मरंध्र शिव सहस्रधारांत शिवता शक्ति रुपाने प्रकटल्यावर गतीने तिचा अध:संचार सुरु होतो हेच सृजनकार्य होय. ती शक्ति नाभीस्थानांत प्रवेशल्यावरच संवेद्य होऊन तिच्यात खरे कल्याणकारी धर्मज्ञान संचरित होते. असो. सुषुम्नेची जी स्वयंभू, बाण व पाताळ अशी तीन द्वारे आहेत ती ब्रह्मा, विष्णु व रुद्र या तीन देवतांशी संबंधीत आहेत. यांनांच ग्रंथी ही संज्ञा आहे. ज्यांचे वर्णन सुरुवातीला बघितले.
संजीवनसमाधी म्हणजे जिवंतपणी पुरुन घेणे वा जिवंत समाधी नव्हे. जीवंत वा मृत समाधी यांना योगांत स्थान नाही. असलेच तर थडगे वा पदस्थापना या अर्थाने आहे.
समाधीत जिवंत असणे हाच संजीवन समाधीचा - निर्वाणसमाधीचा बोध होय. न संपणारी निरुत्थान समाधी वा अक्षय निर्वाण समाधी म्हणजेच संजिवन समाधी होय. विश्वसामरस्य साधलेले ईश्वरस्वरुप जेव्हा दृश्य टाकून लीन होते तेव्हा नाहिसे होत नाही तर कार्यार्थ अनेकांतून संचार करत असते. यौगिक सामर्थ्याने पंचमहाभूतांत विलीन केलेले शरीर गरज वाटली तर परत पंचभौतिक तत्त्वांना धारण करुन माऊली शरीर धारणा करु शकते. अर्थात लेकराचा आत्यंतिक शरणागत भाव व विरह बघुन माऊली आपल्या लेकरासाठी असं करुही शकते, असा भाव धारण केलेले वारकरी उपासक अजानवृक्षातळी ज्ञज्ञज्ञानेश्वरी चिंतनात मग्न राहतात. योग्य उपासकाला ओेंकार अनुभव देऊन आपल्या उपस्थितीचा स्पर्श माऊली देतात. संजीवन समाधी सोहळ्याच्या पावन सोहळा निमित्ताने माऊलींचे स्मरण करुन दृश्य वा अदृश्य रुपात त्यांनी आपल्यावर कृपेचा मेघ वर्षित करावा ही प्रार्थना आपण करुयात. आहे. जय रामकृष्णहरी !
लेखन- दामोदर प्र. रामदासी